शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, शिवसेनेतर्फे दानवेंचा निषेध

By admin | Updated: May 13, 2017 00:15 IST

असभ्य भाषा वापरून महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा काँग्रेस तथा शिवसेनेने जाहीर निषेध केला.

ठिकठिकाणी आंदोलन: प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन, काँग्रेसने घेतली पत्रपरिषदलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : असभ्य भाषा वापरून महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा काँग्रेस तथा शिवसेनेने जाहीर निषेध केला. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला ठेस पोहचविणाऱ्या दानवेंच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. जिल्ह्यातील तालुका मुख्यालयासह ठिकठिकाणी निदर्शने करून दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यात भंडारा येथे काँग्रेसने दुपारच्या सुमारास निदर्शने करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिवसेनेने सातही तालुक्यात आंदोलने करुन शेतकऱ्यांवर प्रहार करणाऱ्या दानवेंचा जाहिर निषेध केला.शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले- शिवसेनाशिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात निदर्शने करीत दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या दानवे यांचे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. येणाऱ्या काळात हेच शेतकरी त्यांना त्यांचा जागा दाखवेल.शेतकरी अन्नदाते असून आमचे दैवत आहे. दानवे यांच्यासारख्या विचारांचे नेते कृषी प्रधान देशात कलंक आहेत, अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी दिली. तुमसर येथे झालेल्या आंदोलनात असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.चिचाळ : पवनी तालुका शिवसेना कार्यालयात पवनी तालुका प्रमुख राजु ब्राम्हणकर यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्या दानवे यांचा तिव्र निषेध करण्यात आला. दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन सिंदपूर टि-पॉर्इंटवर रोष व्यक्त केला. यावेळी राजु ब्रम्हणकर, अड्याळ विभाग प्रमुख प्रकाश मानापुरे, जितू इखार, भोजराम वैद्ये, गिरधर कोहपरे, अमित गडपायले, श्रीधर वैद्ये, प्रविण वंजारी, परसराम बावणकर, श्रावण वंजारी व शिवसैनिक उपस्थित होते. तर एक लाखांचे बक्षीसभंडारा : राज्यासह देशातील शेतकऱ्यांना ‘साले’ या शब्दात हिणावणाऱ्या दानवे यांना कुणी जोडा मारल्यास त्यांला एक लक्ष रूपयांचे मी स्वत: बक्षीस देईन, अशी जाहीर घोषणा काँग्रेसचे नेते डॉ. अजय तुमसरे यांनी वार्ताहर परिषदेत केली. मात्र ही घोषणा पक्षाची नसून व्यक्तीगत असल्याचे तुमसरे यांनी स्पष्ट केले.काँग्रेसतर्फे दानवे यांना "साले" ही पदवी प्रदान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार रावसाहेब दानवे यांनी जालना येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्यातील शेतकऱ्यासाठी "साले" या शब्दाचा वापर केल्यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या वतीने खासदार दानवे यांना अतिशय सन्मानपूर्वक "साले" ही पदवी प्रदान करण्यात आली. या आशयाची माहितीही विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने निदर्शने करीत दानवे यांचा निषेध केला. वार्ताहर परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर म्हणाले, दानवे यांची भाषा संस्कृतीला शोभणारी नाही. भाजपा नेत्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याने ते बेताल वक्तव्ये करीत आहेत. राज्यातला तूर उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असून, त्या शेतक-यांची सगळी तूर खरेदी करून शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी शेतक-यांना शिवीगाळ करीत आहेत. शेतकरी भाजप नेत्यांची ही नशा उतरवतील, असे प्रेमसागर गणवीर म्हणाले. शेतकऱ्यांना अश्या विशेषणांनी "सन्माना" ची नव्हे तर कर्जमाफी, उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणारा हमीभाव आणि शेतमालाच्या शासकीय खरेदीची नितांत आवश्यकता आहे. दानवे यांनी शेतकऱ्यांना दिलेली "साले" ही पदवी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने विनम्रतापूर्वक साभार परत करीत आहोत. त्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी, उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणारा हमीभाव आणि शेतमालाच्या शासकीय खरेदीची तरतूद सरकारमार्फत करून द्यावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली. "साले" ही पदवी धारण करण्याची आपली पात्रता नाही, असा टोलाही यावेळी गणवीर यांनी लगावला. पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, मधुकर लिचडे, विकास राऊत, डॉ. अजय तुमसरे, महेंद्र निंबार्ते, राजकपूर राऊत आदी उपस्थित होते. ४जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, प्रदेश महासचिव जिया पटेल, मधुकर लिचडे, विनायक बुरडे, महेंद्र निंबार्ते, शफी लद्दानी, राजकपूर राऊत, सुनील गिहेपुंजे, प्रभु मोहतुरे, माणिकराव ब्राह्मणकर, शंकर राऊत, भूमेश्वर महावाडे, नंदू समरीत, विकास राऊत, मनोहरराव उरकूडकर, प्यारेलाल वाघमारे, रमेश डोंगरे, नीलकंठ कायतें, प्रेम वणवे, विजय सावरबांधे, अशोक कापगते, अजय तुमसर, मुकुंद साखरकर, अनिक जमा पटेल, माणिक भेंडारकर, सचिन घनमारे, अमर रगडे, प्रकाश पचारे, नीरज गौर, गणेश निमजे, भूषण टेम्भूरने, मंगेश हुमने, जयश्री बोरकर, भावना शेंडे, होमराज कापगते, संजय पिकलमुंडे, अजय गौरकार, जनार्धन निंबार्ते, दिनेश बोन्द्रे, शर्मिल बोदेले, प्रा. मारबते, विलास मोथरकर यशवंत, प्रीती बगडे, ज्ञानेश्वर रहांगडाले, भारती लिमजे, शमीम पठाण, अंकुश वंजारी, अशपाक शेख, शुभम साठवणे, सचिन फाले, विवेक गायधने, शुभम वैद्य,शालिक भुरे, रवीकुमार येरखेडे, प्रवीण भोंदे, मुकुंद नाकजोडे, राजू सूर्यवंशी, सुनील बांते, परमेश वलके, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.