शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँक सुरु करण्याची मागणी

By admin | Updated: January 14, 2015 23:03 IST

लाखांदूर तालुक्यातील दिघोरी हे सर्वात मोठे गाव आहे. गावात राष्ट्रीयकृत बँकेची कोणतीही शाखा नसल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

दिघोरी (मोठी) : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी हे सर्वात मोठे गाव आहे. गावात राष्ट्रीयकृत बँकेची कोणतीही शाखा नसल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.दिघोरी मोठी येथे मध्यवर्ती सहकारी बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँक अशा दोन बँका आहेत. मात्र, दोन्ही बँकातून ताबडतोब धनाकर्षाची सोय उपलब्ध होत नाही व बँक कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून धनाकर्ष उपलब्ध जरी करून दिली तरी विविध स्पर्धा परीक्षा, सैन्यभरती तसेच विविध योजनेसाठी राष्ट्रीयकृत बँकेचाच धनादेश हवा अशी अट असल्याने या बँकातील धनादेशाला महत्वच उरत नाही. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु दवाखाना, वनविभाग कार्यालय, पोलीस ठाणे, दोन कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, तलाठी कार्यालय, सेतू केंद्र आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहे. त्यामुळे नेहमीच राष्ट्रीयकृत बँकेशी यांना संलग्न असावे लागते. गावात राष्ट्रीयकृत बँक नसल्याने सानगडी किंवा लाखांदूरवर येथील नागरिकांना व कर्मचाऱ्यांना विसंबून राहावे लागते.येथील तरुण बेरोजगार विविध स्पर्धा परीक्षेला बसतात. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचाच धनादेश लागतोे. राष्ट्रीयकृत बँकेच्या विविध लाभदायी योजना किसान क्रेडीट कार्ड, कंत्राटी शेती, कृषी जमीन योजना, शेतकरी विकास योजना व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत असते. येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडण्याची मागणी शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व व्यापारी वर्गाने केली आहे. येथे सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी राहतात, मात्र त्यांच्याकडून बँकेची मागणी करण्यात आलेली नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी मंडळाने ग्रामसभेत ठराव मांडून राष्ट्रीयकृत बँकेची मागणी केली आहे. (वार्ताहर)