शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

पृथक विदर्भाची मागणी रास्त

By admin | Updated: June 7, 2015 00:50 IST

विदर्भात मोठमोठे खनिज उद्योगांसह नैसर्गिकतेने नटलेली वनसंपदा आहे.

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती : लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेटभंडारा : विदर्भात मोठमोठे खनिज उद्योगांसह नैसर्गिकतेने नटलेली वनसंपदा आहे. असे असतानाही विदर्भाचा बॅकलॉक भरुन निघत नसल्याने विदर्भाचा विकास खुंटला आहे. संयुक्त महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होत नसल्यास व जनतेच्या भावनाचा विचार करुन वेगळा विदर्भ करणे गरजेचे आहे. पृथक विदर्भाची मागणी रास्त असून भाजप लहान राज्यांचा निर्मितीचा पुरस्कर्ता असल्याचे स्पष्टोक्ती भंडाराचे खासदार नाना पटोले यांनी दिली. शनिवारी, दुपारी भंडारा येथील लोकमत कार्यालयात सदिच्छा भेट दिली असता दिलखुलास मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी लोकमतशी चर्चा करताना विदर्भात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या आहेत. देशाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या बळीराजावर हा प्रसंग ओढवत असल्याने त्यांचे दु:ख मनात सलते. १ मे रोजी वेगळया विदर्भाची भूमिका घेणाऱ्यांनी काळे झेंडे फडकवून निषेध नोंदविला होता. आपणही वेगळया विदर्भाची मागणी रेटून लावण्यासाठी संसदेत आवज उठविला. भाजपने विधानसभा व लोकसभा निवडणुकीदरम्यान जो जाहिरनामा प्रसिध्द केला. त्यात कुठेही वेगळ्या विदर्भाची भूमिका स्पष्ट केलेली नाही. असे असतानाही भाजपा लहान राज्यांच्या निर्मितीचा पुरस्कर्ता असल्याने व विदर्भातील जनतेचा भावनांचा विचार करुन वेगळा विदर्भ करावा, अशी आपली भूमिका आहे.भंडारा-गोंदिया या जिल्ह्याचे नेतृत्व करताना विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नेहमी आवाज उठवित आहे. विधानसभेत असतानाही शेतकऱ्यांची बाजू लावून धरली. मात्र केंद्र सरकारच्या सहकार्याविना राज्य सरकार काम करु शकत नाही. त्यामुळे शेतकरी धोरण तयार व्हायला विलंब लागतो. त्यामुळे पक्षत्याग केल्यानंतर भाजपात प्रवेश करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.शेतकरी हा देशाचा कणा असून इंग्रजकालीन कायद्याच्या दडपणाखाली त्याला ठेवून वाकविण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यामुळे शेतकऱ्यांना ताट मानेने जगण्यासाठी शेतकरी धोरण बनविणे गरजेचे आहे. १९३७ पासून इंग्रजकालीन आणेवारी पध्दत भारतात अस्तित्वात आली. त्यात ५० टक्क्यांच्या वर नुकसान ग्राह्य धरले जाते. मात्र, प्रशासनाकडून तयार होत असलेला अहवाल वेळप्रसंगी चुकीचा राहतो. त्यामुळे शेतकरी नुकसानभरपाई व पीक विम्यापासून वंचित राहतो. या धोरणात बदल करणे गरजेचे होते. आपल्या कार्यकाळात शेतकरी हिताचा निर्णय व्हावा, ही आपली मनस्वी इच्छा होती. त्यानुसार मोदीजींनी या धोरणात बदल केला. या धोरणानुसार ३३ टक्के नुकसानग्रस्तांनाही अहवालानंतर नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. तसेच त्यांना नुकसान भरपाई व पिकविमा मिळणार असून आपल्या कार्यकाळात ही बाब पूर्ण झाल्याने अभिमान वाटतो.यासोबतच वरठी रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार आहे. मुंबई ते कोलकाता रेल्वेलाईन दरम्यान अन्य कुठल्याही रेल्वे स्थानकावर नसलेली सुविधा गोंदिया येथे सुरु करण्यात आलेली आहे. आगामी काळात या मार्गावर नविन रेल्वे गाड्या सुरु होणार असून गोंदिया ते जबलपूर या रेल्वे मार्गासाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी असलेला वनविभागाचा अडथळाही दूर करण्यात आलेला आहे. यासाठी दक्षीणेकडून येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या वाराणसीपर्यंत पोहचणार असल्याने दळणवळणाची पूर्ण सुविधा होणार आहे. वाहतूक व्यवस्थेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लाखनी, साकोली येथे मुख्य मार्गावर उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. सोबतच सौंदड रेल्वे स्थानकावरही उडाणपुल बांधण्यात येणार आहे. नागरिकांच्या सहकार्यातून व त्यांनासोबत घेवून सर्व कामे करुन क्षेत्राचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकशाहीचे खरे फळ या माध्यमातून चाखता येईल. यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे खा. पटोले यांनी यावेळी सांगितले. (शहर प्रतिनिधी)मोठ्या भावाची भूमिका पार पाडूआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात विचारले असता, त्यांनी भाजप हा शिवसेनेचा मोठा भाऊ असल्याने आम्ही मोठया भावाची भूमिका पार पाडणार आहोत. निवडणुकीसंदर्भात शिवसेनेसोबत चर्चा झालेली नाही. ही आगामी निवडणूक दोन्ही पक्षाने एकत्र लढावी, अशी भाजपची भूमिका राहणार आहे. जर-तरच्या प्रसंगी भाजप स्वतंत्र विचार करेल. व जनतेच्या विश्वासाने पुन्हा एकदा निवडणूक लढवून सत्ता काबीज करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.