शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतात वाढली भंडाऱ्यातील भेंडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:58 IST

धानाच्या कोठाराला चुलबंद व वैनगंगा नदीने सुपीक केले. भातशेतीसोबतच शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. लाखनी तालुक्यात तर भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आता दर्जेदार भाजीपाल्यासोबतच भेंडीला परप्रांतात चांगली मागणी आहे.

ठळक मुद्दे३० रुपये किलो दर : दररोज होते २५ टन भेंडीची निर्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाच्या कोठाराला चुलबंद व वैनगंगा नदीने सुपीक केले. भातशेतीसोबतच शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. लाखनी तालुक्यात तर भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आता दर्जेदार भाजीपाल्यासोबतच भेंडीला परप्रांतात चांगली मागणी आहे. ३० ते ३२ रुपये किलो जाग्यावरूनच भेंडी विकली जात असून दररोज २५ टन भेंडी विविध प्रांतात निर्यात केली जात आहे.शेतमालाला बाजारपेठेची समस्या सर्वत्र दिसून येते. शेतकऱ्यांच्या हाती मुबलक पीक आले की बाजारात भाव पडतात. भाजीपाला विक्रीत तर व्यापारी, एजंट शेतकऱ्यांची लुबाडणूकच करतात. यावर मात करण्यासाठी भंडारा येथील बंडू बारापात्रे यांनी बीटीबी खासगी सब्जीमंडीची सुविधा सुरु केली. शेतकºयांना या सब्जीमंडीचा चांगलाच लाभ होऊ लागला. शेकडो शेतकरी येथे आपला भाजीपाला घेऊन येतात.अलीकडे शेतकरी भेंडी पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे. लाखनी तालुक्यातील खेडेपारचे नारायण धरमशहारे, सोमलवाडाचे सुखदेव टिचकुले, पालांदुरचे बळीराम बागडे, सामेवाडाचे देवराव बोळणे, भंडारा तालुक्यातील बेटाळाचे बंडू ईश्वरकर, गडपेंढरीचे नाजूक गायधने आदी मोठ्या प्रमाणात भेंडीचे पीक घेत आहेत. बाजारात अपेक्षित भाव मिळत असल्याने ते येथील बीटीबी मार्केटमध्ये आपली भेंडी विक्रीसाठी आणतात. सध्या भेंडीला ३० ते ३२ रुपये भाव मिळत असल्याचे या शेतकºयांनी सांगितले.भंडारा जिल्ह्यातील भेंडीला उत्तर प्रदेशातील बनारस, गोरखपूर, दमोह, मध्यप्रदेशातील जबलपूर, सागर, कटनी, शिवनी, छिंदवाडा, झांशी, टिकमगड, बिहारमधील पाटणा, छत्तीसगडमधील रायपूर, बिलासपूर, अंबीकापूर येथे मोठी मागणी आहे. येथून हा भेंडी विशिष्ट पद्धतीने पॅकींग करून पाठविला जातो. यासोबतच इतर भाजीपालाही परप्रांतात पाठविला जात आहे.भंडारा जिल्ह्यातील भाजीउत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे. आज भंडारातील भेंडीसह इतर भाजीपाला परप्रांतात जात आहे. भंडाराची ओळख भातासोबत भाजीउत्पादक म्हणूनही होत आहे. त्यातून शेतकऱ्यांना फायदा होत आहे.-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी