शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती नळांना मीटर लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

केशोरी येथे ग्रामपंचायतीकडून नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दूरवरून पिण्याचे पाणी आणण्याची पायपीट थांबली असली तरी घरगुती ...

केशोरी येथे ग्रामपंचायतीकडून नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दूरवरून पिण्याचे पाणी आणण्याची पायपीट थांबली असली तरी घरगुती पाणी सोडण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे दिवसभरात कोणत्याही वेळेत पाणी सोडले जात असल्यामुळे महिलांची फारच गैरसोय होत आहे. केव्हाही पाणी सोडत असल्यामुळे नळाद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. गावातील बऱ्याच नळांना तोट्या लावल्या नाहीत. पिण्याचे पाणी सोडण्याची वेळ निश्चित असली तर त्याच वेळेत महिलांनी पाणी भरण्याचे कार्य केले असते. परिणामी, महिलांना पाणी येण्याची वाट पाहावी लागते. अनेक दिवसांपासून नळांना मीटर लावण्याची मागणी होत आहे; परंतु या मागणीकडे ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. नळांना मीटर योजना कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्राहकांकडून आधार कार्डची मागणी केली होती;मात्र अद्यापही मीटर लावण्यासंबंधी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. कधी-कधी तर रात्रंदिवस नळ सुरू राहत असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. घरगुती नळांना मीटर लावल्यास ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडल्याशिवाय राहणार नाही. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन घरगुती नळाला मीटर लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.