शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हद्दपारीची कार्यवाही टाळण्यासाठी दहा हजार रुपयाची मागणी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: June 17, 2025 19:13 IST

Bhandara : पवनीच्या पोलिस नाईकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हद्दपारीची कारवाई टाळतो, मात्र त्यासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपीच्या भावाकडे करणाऱ्या पवनीतील पोलिस कर्मचाऱ्यावरच आरोपीच्या पिंजऱ्यात पोहचण्याची पाळी आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नसली तरी, गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई सुरू आहे.

अजित प्रल्हाद वाहने (३७) असे या पोलिसाचे नाव असून तो पवनीच्या पोलिस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत आहे. तक्रारदाराच्या भावाविरूद्ध मुंबई पोलिस कायदा कलम ५६ नुसार, पवनी पोलिस ठाण्याकडून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. त्याच्या हद्दपारीची मुदत दिनांक १३ जूनला संपणार होती. या दरम्यान, अजित वाहने याने हद्दपारीतील संबंधित आरोपीच्या भावाला पोलिस ठाण्यात बोलावले. तुझ्या भावावर पुन्हा तडीपारीची कारवाई किंवा अन्य कसलीही प्रतिबंधक कारवाई करायची नसेल तर त्या बदल्यात १० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. 

या प्रकरणाची तक्रार संबंधित तक्रारदाराने १२ जूनला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. या तक्रारीवरून १३ आणि १४ जूनला पडताळणी करण्यात आली असता, त्याने स्वत: रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

ठरल्यानुसार, १६ तारखेला अजीत वाहने याला १० हजार रुपयांची लाच देऊ केल. मात्र संशय आल्याने त्याने या दिवशी रक्कम स्वीकारण्याचे टाळले. पुन्हा दुसऱ्या दिवशी १७ जूनलाही त्याला रक्कम देऊ केली. मात्र तेव्हाही त्याने टाळले. त्यासाठी विभागाने पंचांचेही नियोजन केले होते. अखेर अजित वाहने याला १७ जूनला दुपारनंतर ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याच्यावरूद्ध पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. आरोपीच्या घराचीही झडती घेतली जात आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा