शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

जिल्हा बँकेकडून संयुक्त देयता गटांना सव्वा कोटीचे कर्ज वितरीत

By admin | Updated: August 28, 2015 01:05 IST

नाबार्डच्या योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुढाकार घेऊन १२५ संयुक्त देयता गटांना ११२.४५ लक्ष रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले.

सहकारी बँक मुंबईचे अध्यक्ष सुखदेवे यांची भेटभंडारा : नाबार्डच्या योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुढाकार घेऊन १२५ संयुक्त देयता गटांना ११२.४५ लक्ष रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष सुखदेवे यांच्या हस्ते कर्ज वितरीत करण्याचा कार्यक्रम बँकेच्या सभागृहात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे हे होते. याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सुखदेवे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संचालक रामलाल चौधरी, श्रीकांत वैरागडे, विलास वाघाये, प्रशांत पवार, रामदयाल पारधी, प्रेमसागर गणवीर, राजू हेडावू, रुबी चढ्ढा, वासुदेव तिरमारे, रामराव कारेमोरे, दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, नाबार्डचे डीडीएम अरविंद खापर्डे, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक पाठक, माजी संचालक डॉ.प्रकाश मालगावे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना सरव्यवस्थापक किशोर बोबडे यांनी केली.नाबार्डच्या सदर योजनेअंतर्गत बँकेनी पुढाकार घेऊन नाबार्ड पुरस्कृत एन.जी.ओ. नवनीत चेतना संस्था सोमलवाडा लाखनी यांचे मार्फत बँकेला ४०० संयुक्त देयता गट स्थापन करून खाते उघडलेले आहे.४०० संयुक्त देयता गटापैकी बँकेनी मागील २ महिन्यात १२५ गटांना रु. ११२.४५ लक्ष कर्ज मंजूर केले आहे. त्यापैकी १० गटांना रु. ६.९५ लक्ष कर्ज वितरण शाखेमार्फत करण्यात आलेले आहे. उर्वरित गटापैकी आज ४७ गटांना रु. ४९.६५ लक्ष वितरण (चेकबुक) कार्यक्रमात वितरण करण्यात येत आहे. यामध्ये ४ गटांना केज कल्चर अंतर्गत रु. १०.०० लाखांचे कर्ज वाटप करण्यात येत आहे. उर्वरीत कर्ज मंजूर गटांना कर्ज वितरणाची प्रक्रिया शाखा स्तरावर चालू असून यथाशिघ्र कर्ज वितरण करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.नाबार्ड मार्फत जिल्हा बँकेला ४ फायनंशिलय लिटरशी सेंटर मंजूर केलेले आहे. त्यामध्ये भंडारा, तुमसर, पवनी व साकोलीया तालुक्याच्या ठिकाणी सदर सेंटर तयार करण्यात येणार आहे. नाबार्ड मार्फत सन १९९२ पासून स्वयं सहाय्य गट निर्मिती व बँक लिकेज कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमाअंतर्गत बँकेनी एकूण ६१५३ गटाचे खाते उघडून ग्रामीण भागातील गरीब गरजू महिलांना आर्थिक पाठबळ देवून त्यांच्या सर्वांगिण विकासाच्या प्रयत्नात सहकार्य करीत आहे. बँकेला नाबार्ड मार्फत एस.एच.पी.आय. अंतर्गत १००० स्वयं सहाय्य गट निर्मित व लिंकेज करण्याचा प्रकल्प मंजूर झाला. त्यामध्ये बँकेनी १००० बचत गटाचे बचत खाते उघडून ७८० गटांना अर्थसहाय्य रु. ६७३.०० लक्ष केलेले आहे. त्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जातात. बँकेने त्याकरिता ५० प्रशिक्षण कार्यक्रम आतापर्यंत घेतलेले आहेत.स्वयं सहाय्य गटांचा पुढाचा टप्पा म्हणून नाबार्डने संयुक्त देयता गट स्थापना करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)