शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

देव्हाडी उड्डाणपुलाची दिल्लीच्या पथकाकडून होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

पूल दोनही बाजूला दगडी आहे. दगडातून मोठ्या प्रमाणात राख वाहून गेली. सदर फ्लाय अ‍ॅश तिरोडा येथील वीज निर्मिती कारखान्यातील आहे. एका बाजुच्या अ‍ॅप्रोज पुलावर मोठे खड्डे व तळे गेले आहे. पुलात पोकळी निर्माण झाली होती. थातूरमातूर पोकळी भरण्यात आली. परंतु पुलाच्या अगदी खालच्या भागात पोकळी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देपुलाला गेले तडे : राख वाहून जाण्याच्या कारणांचा शोध घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी उड्डाणपुलावरून पावसाळ्यात राख वाहून गेल्यानंतर पुलाला मोठे तडे गेले आहेत. वाहतूक सुरू झाल्यानंतर अपघाताची शक्यता बळावली आहे. बांधकाम विभागाने तांत्रिक दुरूस्तीसाठी केंद्रीय रस्ते संशोधन पथकाला चौकशी व पाहणीसाठी पाचारण केले आहे. आता दिल्ली येथील तज्ज्ञांचे पथक या उड्डाणपुलाची पाहणी करून राख वाहून जाणाऱ्या कारणांचा शोध घेणार आहे.तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डापुलाचे बांधकाम सुरू आहे. गत पाच वर्षांपासून कासवगतीने काम सुरू आहे. काम केव्हा पूर्ण होईल याची अद्यापही कुणी खात्री देत नाही. विशेष म्हणजे रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार संयुक्तरित्या हा उड्डाणपूल बांधत आहे. गत तीन वर्षांपासून उड्डाणपूल भरावात फ्लाय अ‍ॅशचा उपयोग केला जात आहे. पूल दोनही बाजूला दगडी आहे. दगडातून मोठ्या प्रमाणात राख वाहून गेली. सदर फ्लाय अ‍ॅश तिरोडा येथील वीज निर्मिती कारखान्यातील आहे. एका बाजुच्या अ‍ॅप्रोज पुलावर मोठे खड्डे व तळे गेले आहे. पुलात पोकळी निर्माण झाली होती. थातूरमातूर पोकळी भरण्यात आली. परंतु पुलाच्या अगदी खालच्या भागात पोकळी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यापूर्वी दिल्ली येथील एका तज्ज्ञ समितीने महिनाभरापुर्वी या पुलाची पाहणी केली. परंतु नेमकी पुलात पोकळी कुठे आहे व ती तांत्रिकदृष्ट्या कशी दूर करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात असमर्थता दर्शविली. त्यामुळे आता पुन्हा बांधकाम विभागाने सीआरआय कॉन्सलिंग ऑफ सायंटिफिक इंडिस्ट्रीयल रिसर्च पथक व सेंट्रल रोड रिसर्च पथकांना बोलाविले आहे. सदर पथक मार्च महिन्यात देव्हाडी उड्डाणपुलाची पाहणी करणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानंतर दुरूस्ती केली जाणार आहे.कारवाईची शक्यतादेव्हाडी उड्डाणपुलाच्या कामात हयगय झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तत्ज्ञांच्या अहवालानंतर संबंधित कंत्राटदाराशी काही रक्कम राखून ठेवण्याची शक्यता आहे. सदर पूल २४ कोटींचा असून याचे काम मात्र आता येथे रखडले आहे.