शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाच्या भीतीने राज्यात पोटनिवडणुकांना विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 21:52 IST

लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा सातत्याने पराभव होत असल्यामुळे राज्यातील भंडारा आणि पालघर या दोन लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात विलंब करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन

आॅनलाईन लोकमतभंडारा : लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा सातत्याने पराभव होत असल्यामुळे राज्यातील भंडारा आणि पालघर या दोन लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात विलंब करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक घेण्यासंदर्भात पटोले यांनी शुक्रवारला दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन दिले आहे. आपण खासदारपदाचा राजीनामा ७ डिसेंबरला दिला. त्यानंतर पालघरचे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाले. तेव्हापासून या दोन्ही ठिकाणी खासदारपद रिक्त आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा व माझा राजीनामा १५ डिसेंबरला या एकाच दिवशी लोकसभा अध्यक्षांनी मंजूर केला.उत्तरप्रदेशातील गोरखपूर व फुलपूर या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक ११ मार्चला झाली. परंतु आपण राजीनामा देऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही पोटनिवडणूक घेण्यात आली नाही. उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपचा पराभव झाला. पोटनिवडणुकासंदर्भात राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची असते. लोकांमध्ये भाजपबद्दल नाराजी असल्यामुळे राज्यातही भाजपचा पराभव होऊ शकेल, या भीतीने मुख्यमंत्री पोटनिवडणुकीसाठी विलंब करीत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार का? यावर ते म्हणाले, निवडणुका तर जाहीर होऊ द्या? निवडणूक कोण लढणार याची चिंता भाजपने करू नये, असा पलटवारही पटोले यांनी केला.