शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात देव्हाडीत पाणीटंचाई

By admin | Updated: June 30, 2017 00:29 IST

तुमसर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या देव्हाडी गावात भर पावसाळ्यात मागील पाच दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

नियोजनाचा अभाव : तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकारलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या देव्हाडी गावात भर पावसाळ्यात मागील पाच दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तीन दिवसांपासून एक थेंब पाणी ग्रामस्थांना मिळाले नाही. मागील दोन दिवसांपासून एक वेळ तोही केवळ १५ मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. नियोजनाचा अभाव येथे दिसत आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यावर उपाययोजना करण्याचा केविलवाणा प्रकार येथे सुरू आहे.देव्हाडी गावाची लोकसंख्या सुमारे सात हजार ५०० इतकी आहे. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर गाव वसले आहे. तालुक्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून नोंद आहे. परंतु किमान मुलभूत समस्या सोडविण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरली आहे. मागील पाच दिवसापासून गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तीन दिवस ग्रामस्थांना एक थेंब पाणीपुरवठा करण्यात आला नाही. त्यानंतर ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा संदर्भात विशेष बैठक बोलाविली होती. त्यात विहिरीचा उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार येथे दिसत आहे.गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर तुमसर-गोंदिया मार्गावर आहे. विहिरीपासून वैनगंगा नदीचे अंतर केवळ दोन मि.मी. इतके आहे. विहिरीत सध्या पाणी नाही. उन्हाळ्यात विहिरीचा उपसा करण्याची गरज होती, परंतु उपसा केला नाही. तीव्र पाणी टंचाईमुळे येथे उपसा करण्याचे सूचले. गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जुनी झाली आहे. त्यामुळे लिकेजची समस्या येथे कायम आहे. पाईप लाईन फुटणे हे नित्याचेच झाले आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल. ग्रामपंचायत अयशस्वी ठरली आहे. येथे ग्रामविकास अधिकाऱ्यांचे पद आहे, परंतु नियोजनाचा अभाव येथे दिसून येतो. बांधकामांना येथे प्राधान्य देण्यात येते. सध्या येथे ग्रामपंचायत भवनाचे कामे सुरू आहेत. मुलभूत समस्येकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे. बुधवारी सायंकाळी पाणी समस्येवरून मांढळ रस्त्यावर संघर्ष झाल्याची माहिती आहे. केवळ विहीर कोरडी पडली काय करणार, असे उत्तर ग्रामस्थांना मिळत आहे. सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.पाणीपुरवठा योजना गावात यशस्वी राबवाव्या, अशा सूचना शासनाकडून आहेत. पाणीपुरवठा योजनेकरिता निधीसुद्धा शासनाकडून दिले जाते. त्याचा लाभ येथील पदाधिकाऱ्यांनी उचलण्याची गरज आहे.