शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:11 IST

यावर्षी अत्यल्प पाऊस आला. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिणामी शेतकºयांना उपजिवीका कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देहेमकृष्ण वाडीभस्मे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : यावर्षी अत्यल्प पाऊस आला. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिणामी शेतकºयांना उपजिवीका कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकºयावरील कर्जाचा डोंगर वाढतच आहे. त्यामुळे शासने साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करुन सर्वांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी युवक राष्टÑवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे यांनी केली आहे.यावर्षी साकोली तालुक्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे ज्यांच्याजवळ सिचंनाची सोय नाही अशा शेतकºयांची रोवनीच झाली नाही. मात्र या शेतकºयांनी कर्ज काढुन हंगामापूर्वी शेतीची संपूर्ण कामे करुन पेरणी पूर्ण केली यात त्यांना हजारो रुपयांचा खर्च आला.मात्र पावसाअभावी ते रोवणी पूर्ण करु शकली नाही. परिणामे धानाचे पºहे तसेच शेतात वाळले आहेत. तर ज्या शेतकºयांचे रोवणी पूर्ण झाली त्यांना भारनियमनाचा फटका बसत आहे. त्यामुळे साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करुन सरसकट कर्जमाफीची मागणी वाडीभस्मे यांनी केली आहे.जिल्हा दुष्काळग्रस्त केव्हा घोषित करणार?भंडारा : अत्यल्प पावसामुळे अस्मानी संकटाचे गंभीर ढग स्पष्ट दिसून लागले असून भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अपुºया पावसामुळे रोवणी खोळंबली हजारो एकर शेती रोवणीअभावी पडीत आहे. पºयांचा कालावधी अडीच महिन्यांपर्यंत पोहचला आहे. पावसाने दडी मारल्याने पºहे वाळली, रोवणी केलेल्या शेतीला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. तसेच अपुºया विद्युतमुळे सिंचनाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते, प्रेम वनवे यांनी केली आहे. लघु सिंचन प्रकल्पात पाण्याचा पाहिजे तसा साठा अजुनही जमा नाही. जलयुक्त शिवार योजनेतून सिंचनक्षम करण्यात आलेल्या मामा तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. अत्यल्प पावसामुळे सिंचनाची अपेक्षा या तलावांकडून करणे धाडसाचे ठरणारे आहे. रोहयो व जलयुक्त तलावातून तयार करण्यात आलेले शेततळे, बोळ्या व नाले कोरडे पडले आहेत. काही शेतकºयांनी रोवणीसाठी जलयुक्त शिवार योजनांतील उपलब्ध पाण्याचा वापर केल्याने आता ती कोरडी पडली आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल असून शासन प्रशासनाने यावर वेळीच उपाय योजना करण्याची मागणी प्रेम वनवे, निलकंठ कायते यांनी केली आहे.