शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

वनहक्क दावे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

By admin | Updated: June 14, 2016 00:16 IST

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्काची मान्यता ) कायदा २००६ व नियम २००८ अंतर्गत लाखांदूर तालुक्यातील ....

लाखांदूर तालुक्यातील प्रकार : अतिक्रमणधारकांची गळचेपीलाखांदूर : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्काची मान्यता ) कायदा २००६ व नियम २००८ अंतर्गत लाखांदूर तालुक्यातील अतिक्रमणधारकांची प्रकरणे मागिल अनेक दिवसांपासून साकोली येथील उपविभागिय कार्यालयात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकली गेल्याने हितसंबंध जोपासणाऱ्यांची प्रकरणे बाहेर काढली जात असल्याचा आरोप जि.प सदस्य रमेश डोंगरे यानी केला आहे.अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी यानी मागिल अनेक वर्षापासून उपजीविकेचे साधन म्हणून वनाच्या जागेवर अतिक्रमण करुन शेती करणे सुरु केल्याने त्या जागेवरील अतिक्रमण आज नियम बाह्य न समजता अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता ) कायदा २००६ व नियम २००८ अंतर्गत अतिक्रमणधारकाकडून प्रस्ताव मागवून शासन स्तरावर मालकी हक्क देण्यासंदर्भात कायदा अमलात आणण्यात आला. यासाठी खासदार नाना पटोले यानी आंदोलन करुन अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) कायदा २००६ व नियम २००८ हा वन हक्क कायदा सुरु करण्यास शासनास भाग पाडले होते. सुरुवातीला अनेक प्रकरणाना मान्यता देऊन मालकी हक्क देऊन त्या अतिक्रमित जागेवर शेती करुन उदरनिर्वाहासाठी वन निवासींना मुभा देण्यात आली होती. यावेळी लगबगीने कार्यवाहीकरिता अधिकारिही पुढे येऊन दावे लवकरात लवकर मंजूर करुन वन निवासींना अधिकार देत होते. परंतु त्यानंतर जवळपास हजारो प्रकरणातील नकाशे डिलीट झाल्याच्या कारणाने प्रकरण तालुका स्तरावर परत पाठवण्यात आले. १५४२ प्रकरणे लाखांदूर तहसील कार्यालयात प्राप्त झाले. त्यापैकी ३९२ पात्र प्रकरणे व ४७३ अपात्र प्रकरणे उपविभागीय अधिकारी साकोली यांचेकडे सादर करण्यात आली. सध्या तालुक्यातील तलाठ्यांकडे ६७७ प्रकरणे शिल्लक आहेत. या संदर्भात मागील अनेक दिवसापासून एकही मंजूर प्रकरण तहसील कार्यालयात येत नसल्याच्या कारणावरुन साकोली येथील उपविभागीा अधिकारी कार्यालयात जाउन भेट दिली असता प्रकरणे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकली असल्याचे चित्र जि. प. सदस्य रमेश डोंगरे यानी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले. आर्थिक देवाण-घेवाण करुनच नंतर त्या त्या व्यक्तीची प्रकरणे निकाली काढल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. (तालुका प्रतिनीधी)अतिक्रमणधारकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे साकोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात माहिती जाणून घेण्यात आली. वन हक्काची प्रकरणे निकाली काढण्यासाठी खुलेआम पैसे मागत असल्याचे दिसून आले. कर्मचारी शेतकऱ्यांचे ऐकूण घेण्यास तयार नव्हते. उलट लाखांदूर तालुक्यातील अनेक प्रकरणे ही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकली गेल्याचे दिसून आले. अशाच कारणामुळे मागील हजारो प्रकरणांची नकाशे ‘डिलीट’ झाल्याचे समजून कर्तव्यात कसूर व हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. रमेश डोंगरे जि.प चे माजी उपाध्यक्ष तथा जि. प. सदस्य