शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या विचाराचे वैभव वाचण्याचा संकल्प करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 23:08 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शक्तीस्थान ही त्यांची बुद्धीमत्ता होती. बाबासाहेबांनी प्रचंड वाचन व लिखाण केले. आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करताना बाबासाहेबांची किती ग्रंथसंपदा वाचली याचा विचार करायला हवा.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी दिवसे : समता सप्ताहाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शक्तीस्थान ही त्यांची बुद्धीमत्ता होती. बाबासाहेबांनी प्रचंड वाचन व लिखाण केले. आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करताना बाबासाहेबांची किती ग्रंथसंपदा वाचली याचा विचार करायला हवा. आजच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या विचारांचे वैभव वाचण्याचा संकल्प केल्यास, बाबासाहेबांना हीच खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.सामाजिक न्याय विभाग व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समता सप्ताहाचा समारोप व अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, सहाय्यक आयुक्त आशा कवाडे, न.प. उपाध्यक्ष आशु गोंडाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, समितीचे अध्यक्ष वसंत हुमने, सचिव एम.आर.राऊत, कोषाध्यक्ष महेंद्र वाहाणे, संघटक यशवंत नंदेश्वर उपस्थित होते.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ८ ते १४ एप्रिलदरम्यान समता सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहात शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमाबाबत गावागावात जनजागृती करण्यात आली. समता सप्ताहाचा समारोप करण्यात आला. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्रिमूर्ती चौकातील पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी बार्टीच्या समतादुतांनी जागर संविधानाचा यावर पथनाट्य सादर करून संविधानाची महती सांगितली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने महामानव हे पुस्तक व लोकराज्य स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, समितीच्या सदस्यांनी भेटी देऊन पाहणी केली.