शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:25 IST

मित्राच्या लग्नावरुन परतीच्या प्रवासात शिवणी/बांध वळणावर दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीचालक भुपेश उर्फ सोनु प्रकाश तलमले (२६) पालांदूर यांचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला.

ठळक मुद्देशिवणीबांध वळणावरील घटना : उपचारादरम्यान मालविली प्राणज्योत

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : मित्राच्या लग्नावरुन परतीच्या प्रवासात शिवणी/बांध वळणावर दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीचालक भुपेश उर्फ सोनु प्रकाश तलमले (२६) पालांदूर यांचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला.मित्राच्या लग्नाकरिता सोनू हा एकटाच मित्राच्या दुचाकीने अर्जुनी येथे गेला होता. परतीच्या प्रवासात शिवणीबांध वळणावर रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याच्या दुचाकीला अपघात झाला. ही घटना शनिवारला घडली. रविवारला सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्याच्याजवळ मिळालेल्या पत्यावरुन घरच्यांशी संपर्ककरुन घटनेची माहिती देण्यात आली. प्रथम भंडारा व नंतर नागपूरला उपचार करण्यात आले. पण सोनूचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. अपघात कसा घडला हे कळू शकले नाही. तलमले कुटुंबियांवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. वडील प्रकाश तलमले हे पोलीस विभागात सेवेत आहेत. सोनू हा मनमिळावू स्वभावाचा सुशिक्षीत तरुण असून त्याने शुध्द पाण्याच्या स्वयंरोजगार उभारला होता. त्याचे मागे वडील, आई, बहिण व असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारला सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.