शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:42 IST

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावानजीक सिलेगाव फाट्याजवळ दुचाकी चालकाने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदोन जखमी : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील घटना

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावानजीक सिलेगाव फाट्याजवळ दुचाकी चालकाने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. तर अन्य २ जण जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. मनोज शरणागत (२५) रा. सिहोरा असे मृत तरुणाचे नाव आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची श्रृंखला सुरु झाली आहे. दररोज अपघात घडत आहेत. या खड्ड्यांनी दोन वर्षात ११ जणांचा बळी घेतला आहे. राज्य मार्गावरुन रहदारी करणारे वाहनधारक असुरक्षित असल्याचा अनुभव घेत आहेत. शनिवारी सिहोरा येथील मनोज शरणागत आणि तोषिण शेख हे दोघे मित्र दुचाकी क्रमांक एम एच ४० झेड ३७७२ ने तुमसरकडे निघाले. राज्यमार्गावर सिलेगावकडून सायकलने सुखलाल पारधी हे येत होते. यात दुचाकीने सायकलस्वारला जोरदार धडक दिली. या धडकेत मनोज शरणागत (२५) रा. सिहोरा हा गंभीर जखमी झाला. उपचाराकरिता नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला तोषिण शेख आणि सायकलस्वार सुखलाल पारधी हे गंभीर जखमी झाले. गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तुमसरच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मनोजचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता तुमसर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. सिहोरा पोलीसांनी घटनेची नोंद केली असून तपास पोलीस निरीक्षक मनोहर कोरोटी यांच्या मार्गदर्शनात जयसिंग लिल्हारे करित आहेत.वाहनाच्या धडकेत वाहक जखमीचुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील सिंदपुरी येथे राज्य मार्गाच्या कडेला उभा असलेल्या चैतन्य संजय शरणागत (५) वर्ष या बालकाला बपेराहून तुमसरकडे जाणाºया दुधाची वाहतूक करणाºया वाहनाने धडक दिली. जखमी बालकाला सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शीनी धडक देणाºया वाहनाचे क्रमांक एम एच ३६- ३२०७ असल्याची माहिती दिली आहे. तुमसर बपेरा राज्य मार्गावर दोन दिवसात दोन अपघात घडले. दुधाची वाहतुक करणाºया वाहनाने बालकाला धडक दिल्यानंतर सिलेगावात एका घराच्या सुरक्षा भिंतीला धडक दिली. या अज्ञात वाहनाचा शोध वाहतुक पोलीस सतीश सार्वे घेत आहेत.वळणावर फलक नाहीतराज्य मार्गाची थातुरमातुर दुरुस्ती, यामुळे मार्गाची स्थिती ‘जैसे थे’ आहे. या राज्य मार्गावर अनेक नागमोडी वळण आहेत. या वळणावर दिशादर्शक फलक लावण्यात आले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग (शहर) चे यात सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या विभागाच्या यंत्रणेला अपघाताला जबाबदार धरण्यात येत आहे.