शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेनंतर प्रसूत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:51 IST

गर्भार महिलेला रक्त चढविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाला धोका असल्याचे सांगून महिलेवर प्रसूत शस्त्रक्रिया केली. यात चुकीची नस कापल्याने अतिरक्तस्त्राव झाला.

ठळक मुद्देजिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना : चुकीची नस कापली-पतीचा आरोप

आॅनलाईन लोकमतभंडारा : गर्भार महिलेला रक्त चढविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाला धोका असल्याचे सांगून महिलेवर प्रसूत शस्त्रक्रिया केली. यात चुकीची नस कापल्याने अतिरक्तस्त्राव झाला. त्यामुळे तिला नागपुरात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच तिची प्राणज्योत मालविली. वंदना सूर्यभान मानकर (३२)रा. मांगली, ता. लाखनी असे मृत महिलेचे नाव आहे.चुकीची नस कापल्यानेच तिचा मृत्यू झाला, असा आरोप करीत मृत महिलेच्या पतिने संबंधितांवर कारवाई करण्याची तसेच शासन योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. माहितीनुसार वंदना मानकर या ३२ वर्षीय महिला ८ महिन्यांची गर्भार होती. नववा महिना लागल्यामुळे तपासणीसाठी तिला ४ मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरिरात रक्ताचे प्रमाण कमी असल्यामुळे तिला रक्त चढवावे लागेल, अशी सुचना डॉक्टरांनी केली. तिला बी पॉझीटिव्ह गटाचे दोन पिशव्या रक्त चढविण्यात आले. बुधवारी वैद्यकिय अधिकाºयांनी बाळाचे ठोके कमी असल्यामुळे वंदनाच्या जीवाला धोका होवू शकतो असे कारण सांगून तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास अडीच तास शस्त्रक्रिया झाली. वंदनाने गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचे वजन पावणे दोन किलो असून शस्त्रक्रियेदरम्यान वंदनाला अतिरक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे ति गंभीर रुपात अस्वस्थ असल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला दाखल करावे लागेल असे वैद्यकिय अधिकाºयांनी सांगितले. त्यानुसार वंदनाला रुग्णवाहिकेतून नागपूरला दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच तिची प्राणज्योत मालविली. नागपूर येथे उत्तरीय तपासणीनंतर वंदना मृतदेह कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.विशेष म्हणजे वंदनावर प्रसुत शस्त्रक्रिया करित असताना गर्भशयाच्या पिशविची शस्त्रक्रिया व कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया सुध्दा करण्यात आल्याचेही सुर्यभान मानकर यांनी सांगितले.तसेच शस्त्रक्रियेपुर्वी आवश्यक असलेल्या दस्ताऐवजांवरही सुर्यभान यांची स्वाक्षरी घेण्यात आली. सध्या स्थितीत नवजात बालिकेवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील एसएनसीयु विभागात उपचार सुरु असून ती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येते. या घटनेची रितसर तक्रार पालांदूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी द्यायला सुर्यभान मानकर गेले असता पोलिसांनी ही घटना आमच्या हद्दीत नाही असे बोलून तक्रार घेण्यास नकार दिला.‘अभय’चे ममत्व हिरावलेसुर्यभान व वंदना यांच्या संसाररुपी वेलीवर ‘अभय’ नावाचे फुल उमलले. तो आता सहा वर्षांचा असून इयत्ता पहिल्या वर्गात शिकत आहे. या दाम्पत्याचे हे दुसरे मुल आहे. बुधवारी वंदनाचा दुर्देवी मृत्यू झाला. अभयला ही गोष्ट माहित होताच, काही काळासाठी तो निशब्द झाला. आता तो फक्त आई... आई! म्हणून सतत हाक मारतो. कोवळ्या वयात अभयचे ममत्व हिरावल्याने निरागस चेहºयाकडे पाषाणालाही पाझर फुटावा असे मन हेलावणारे दृष्य सध्या सुर्यभान मानकर यांच्या घरी दृष्टीस पडत आहे.वंदना मानकर यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांनी केले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे पुढील उपचारासाठी नागपुरला हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र नियतीने साथ दिला नाही. मुख्यमंत्री सहायता निधीतून मानकर कुटुंबियाला मदत दिली जाऊ शकेल काय, यावर निर्णय घेतला जाईल.-डॉ.रविशेखर धकाते, जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा.