शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

बाळंतपणानंतर महिलेचा मृत्यू

By admin | Updated: December 20, 2014 00:38 IST

माता बालक यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने जननी शिशु सुरक्षा योजना अंमलात आणली.

साकोली : माता बालक यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने जननी शिशु सुरक्षा योजना अंमलात आणली. साकोली तालुक्यात या योजनेचा फज्जा उडाला असून माता मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. नोव्हेंबर महिन्यात एका मातेचा मृत्यू झाला तर आज पहाटे प्रीती भारत नागमुडे (२३) या मातेच्या बाळंतपणानंतर अवघ्या काही तासातच जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली.प्रीती भारत नागमुडे रा.सानगडी ही पतीसह मागील पाच महिन्यापूर्वी सानगडी येथे नातेवाईकांच्या आसऱ्याने कामाच्या शोधात आली. सानगडी येथे या दांपत्याचे पारंपारिक व्यवसाय म्हणून बांबूपासून टोपली, सुप तयार करण्याची कामे करणे सुरु केले. या दरम्यान प्रितीने आपल्या गर्भधारणेची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्र सानगडी येथे केली. सानगडी येथेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत होती. काल प्रितीला बाळंतपणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सानगडी येथे दाखल करण्यात आले. काही वेळानंतर प्रितीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रितीची प्रकृती खराब झाल्याने तिला उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे हलविण् यात आले. साकोली येथे काही काळ उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही म्हणून तिला तात्काळ रात्रीच जिल्हा रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पहाटे प्रितीने या जगाचा निरोप घेतला. प्रितीचा मृतदेह तिच्या मुळगावी वडसा येथे नेण्यात आला. तिथेच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)