शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वर्षा रामटेके यांचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:31 IST

काही कामानिमित्त लाखनीहून भंडारा येथे जाताना पालांदूर क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या वर्षा दिलवर रामटेके (३०) यांचा बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील शिंगोरी-पलाडी या गावाजवळ घडली. या घटनेमुळे पालांदूर परिसरात शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देशिंगोरी-पलाडी महामार्गावरील घटना : पालांदूर जि.प. क्षेत्रात शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव/पालांदूर : काही कामानिमित्त लाखनीहून भंडारा येथे जाताना पालांदूर क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या वर्षा दिलवर रामटेके (३०) यांचा बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील शिंगोरी-पलाडी या गावाजवळ घडली. या घटनेमुळे पालांदूर परिसरात शोककळा पसरली आहे.रविवारला भुपेश तलमले (२६) याचा अपघाती मृत्यू झाला होता. सोमवारला त्याच्या अंत्ययात्रेतून परतल्यानंतर त्या स्वत:च्या दुचाकीने (एमएच ३६/डब्ल्यु ३९६६) भंडारा येथे जात होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर शिंगोरी-पलाडीजवळ बस क्रमांक (एमएच १४/बीटी ०८६८) ची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक लागली. यात दुचाकीचा चुराडा झाला तर वर्षा रामटेके यांचा जागीच मृत्यू झाला.वर्षा या उच्चशिक्षित असून शिक्षिका होत्या. १५ जुलै २०१५ ला त्या पालांदूर जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपच्या उमेदवारीवर त्या निवडून आल्या होत्या. मागील ३४ महिन्यात त्यांनी या क्षेत्रात अनेक विकासकामे केली आहेत.लाखनी पंचायत समितीचे माजी सभापती दिलवर रामटेके यांच्या कन्या असून त्यांना वडिलांकडून राजकीय वारसा मिळाला होता. त्यांच्यामागे पती, आई, भाऊ व बहिण असा आप्त परिवार आहे.घटनेची माहिती कळताच सभापती प्रेम वनवे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, उत्तम इळपाते, प्यारेलाल वाघमारे, सभापती पवन कोराम, प्रशांत खोब्रागडे, पं.स. सदस्य गोवर्धन वैद्य, विनोद बांते, प्रल्हाद भुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर आ.बाळा काशिवार, लोकसभेचे उमेदवार हेमंत पटले, गीता कापगते यांच्यासह पालांदूर परिसरातील कार्यकर्त्यांनी दिलवर रामटेके यांच्या घरी भेट दिली होती. त्यांच्या निधनामुळे पालांदूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कारधा पोलिसांनी बसचालक गोविंदा सयाम रा.नागपूर याच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.