शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

खतमिश्रित कुटार खाल्ल्याने तीन जनावरांचा मृत्यू

By admin | Updated: October 18, 2015 00:10 IST

रासायनिक खत विक्रीच्या गोदाम रिकामे करताना तेथील खत मिश्रीत कुटार शेतशिवारात फेकले.

कवलेवाडा येथील घटना : दोषीविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा तुमसर : रासायनिक खत विक्रीच्या गोदाम रिकामे करताना तेथील खत मिश्रीत कुटार शेतशिवारात फेकले. दरम्यान चराईकरिता सोडलेल्या जनावरांनी ते खाल्ल्याने त्या जनावरांचा मृत्यू झाला. या शेतकऱ्याला ८० हजार रुपयाचे नुकसान सोसावे लागले. ही घटना गुरुवारला सकाळी कवलेवाडा येथील पांढरी जागेवर घडली. याप्रकरणी गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक गौपाले रा.कवलेवाडा असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. बलराम झाडू पेंदाम रा. कवलेवाडा असे अटकेत असलेल्या तरुणाचे नाव आहे. कवलेवाडा येथे अग्रवाल यांच्या मालकीची परवानाधारक खत विक्री दुकानलगतच खताचे गोदामही आहे. खत गोदामात ठेवताना कुटार जमिनीवर अंथरूण त्यावर खतांच्या बॅग ठेवल्या जाते. खरीप पिकाचा हंगाम संपल्याने व गोदामध्ये ठेवलेल्या खताची विक्री झाल्याने खत गोदामाची सफाई १४ च्या सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. गोदामामधील कुटार ट्रॅक्टरमध्ये भरून ट्रॅक्टर चालक धुटेरा जवळील पांढरी जागेवर कवलेवाडा शेतशिवारात फेकून निघून गेला. दरम्यान १५ रोजी सकाळी कवलेवाडा येथील शेतकरी अशोक गौपाले यांच्या मालकीची गाय, गोरा म्हैस असे ८० हजार रुपये किमतीचे जनावरे चरण्याकरिता सोडले असता त्यांनी ते कुटार खाल्ल्याने त्या जनावरांचा मृत्यू झाला. जनावरे अजूनपर्यंत घरी पोहचले नाहीत, म्हणून शेतकऱ्याने पाहणी केली असता गाई, म्हैस व गोरा मृतावस्थेत दिसून आला. त्यालगत कुटारही पडलेला दिसला व त्यातून खताचा दुर्गंध येत असल्याने शेतकऱ्याने पोलिसात तक्रार नोंदविली. त्यानुसार ट्रॅक्टरचालक बलराम पेंदाम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. या घटनेचा तपास हवालदार कृषी तांडेकर, राहुल गिरीपुंजे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)