शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने शेतमजुराचा मृत्यू

By admin | Updated: September 21, 2015 00:21 IST

शेत शिवारात गेलेल्या एका ३५ वर्षीय शेतमजुराचा विजेच्या जिवंत तारांचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला.

संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यात गर्दी : १० लाखांची मदत द्या, अड्याळ येथील प्रकारअड्याळ : शेत शिवारात गेलेल्या एका ३५ वर्षीय शेतमजुराचा विजेच्या जिवंत तारांचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास अड्याळ शेत शिवारात घडली. संदीप नवघडे रा. अड्याळ असे मृतकाचे नाव आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मृतकाच्या कुटूंबीयाला १० लाखांची मदत दयावी या मागणीवरुन पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली.माहितीनुसार अड्याळ येथील विनायक ढवळे यांच्या सोबतीला संदीप नवघडे यासह अन्यजण शेतशिवारात पिक पिकाची पाहणीकरीता गेले होते यादरम्यान शेतशिवारातील विद्युत खांबावरील जिवंत तार तुटून धानपिकात पडले होते. संदीप हा बांध्यांमधून जात असताना त्याचा पायाचा स्पर्श विजेचा जिवंत ताराचा झाला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याची माहिती गावात पोहचताच घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली. विद्युत विभागाने वेळेआधीच तुटलेल्या तारांची दुरुस्ती केली असती तर निष्पाप संदीपचा जीव गेला नसता, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून संबंधीत दोषींवर कारवाई करुन मृतकाचा कुटूंबाला १० लक्ष रुपयाची तातडीची मदत दयावी अशी मागणी केली. संदीप हा घरातील एकमेव कमावता होता. त्याच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत. सायंकाळी उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपलीमहिन्याभरापूर्वी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी जिल्हयात आढावा सभा घेवून नादुरुस्त असलेल्या विद्युत रोहित्र तथा तुटलेल्या तारांबाबत दुरुस्तीचे आदेश दिले होते. मंत्र्यांच्या आदेशाला पायदळी तुडविले काय? असे या आजच्या घटनावरुन स्पष्ट होते. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना घरी पाठविण्यात येईल असेही बजावण्यात आले होते. या प्रकरणी शासन काय कारवाई करते याकडे अड्याळ वासीयांचे लक्ष लागले आहे.दोषी असलेल्या संबंधितावर कारवाई करण्यात येईल. घटनेसंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचविण्यात येईल. - अजाबराव नेवारे,पोलीस निरीक्षक अडयाळ