शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

मृत्यूनंतरही भय ईथे संपत नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:37 IST

माणुस जन्माला आल्यानंतर एक दिवस मृत्यू अटळ आहे. जगताना कितीतरी हालअपेष्ठा सहन करीत असतो. मानसन्मान, माझा-तुझा करीत जगत असतो.

ठळक मुद्दे२९४ गावांत स्मशानशेडची आवश्यकता : ५६९ स्मशानभूमीत हातपंपाची मागणी, रस्त्यांसह अतिक्रमणाचा प्रश्न बिकट

आॅनलाईन लोकमतभंडारा : माणुस जन्माला आल्यानंतर एक दिवस मृत्यू अटळ आहे. जगताना कितीतरी हालअपेष्ठा सहन करीत असतो. मानसन्मान, माझा-तुझा करीत जगत असतो. परंतु मरणानंतर सरणावर जाताना या समस्या कायम असल्याची प्रचिती भंडारा जिल्ह्यात येत आहे. चार दिवसांपूर्वी जवाहरनगर येथे कब्रस्थान नसल्यामुळे पार्थिवच ग्रामपंचायत कार्यालयात नेण्याची वेळ तेथील मुस्लिम बांधवावर आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्मशानभूमीची दुरावस्था, जागेचा अभाव आणि सुविधांबाबत मागोवा घेतला असता हे दाहक वास्तव उघडकीस आले.भंडारा जिल्ह्यातील ७७७ गावांचा कारभार ५४१ ग्रामपंचायतीमधून केला जातो. या ग्रामपंचायतींच्या अखत्यारितील स्मशानभूमीत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र अनेक गावांमध्ये स्मशानभूमीपर्यंत जनसुविधा योजना पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणाºया नातेवाईकांना आजही अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.भंडारा जिल्ह्यातील ७७७ गावांपैकी केवळ ४८३ गावांमध्येच स्मशानशेडची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे २९४ गावांतील नागरिकांना पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याकरिता शेतशिवारात किंवा नदी-नाल्याच्या काठावर सोपस्कार आटोपावे लागत आहे. २०८ स्मशानभूमीत शेडसह पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी हातपंपाची व्यवस्था करण्यात आली. तर ५६९ स्मशानभूमी हातपंपापासून वंचित आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना एक तर घरुनच पाण्याची व्यवस्था करुन न्यावे लागते अन्यथा नदी-नाल्यांमध्ये असलेल्या पाण्यांवर अंत्यसंस्कारानंतरची प्रक्रिया आटोपावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांसह ओढयातील जलस्त्रोत आटल्याने आधीच शोकाकूल नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची प्रचिती जिल्हावासियांना येत आहे.या सुविधांचा अभावअनेक गावात स्मशानभूमी असली तरी नागरिकांनी मागणी करुनही त्यांना जनसुविधा योजनेच्या निधीतून स्मशानभूमी किंवा तेथील सुविधा उपलब्ध करुन देण्यात प्रशासनाला यश आले नाही. अनेक स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यांची समस्या आजही कायम आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी जाताना अनेकांना चिखलमाती तुडवित जावे लागते. यात अनेकदा मृतदेहाची विटंबनाही होते. स्मशानभूमीत शेड, पाण्याची सुविधा, सभागृह, विद्युत पुरवठा नसल्याने ग्रामस्थांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.स्मशानभूमीला अतिक्रमणाने घेरलेगाव तिथे स्मशानभूमी ही कागदोपत्री अस्तित्वात आहे. मात्र अनेक गावातील स्मशानभूमीवर दुर्लक्षितपणामुळे लगतच्या शेतकरी किंवा प्लॉट विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचेही प्रकरण उघडकीस आले आहे. अनेक प्लॉट धारकांनी काही ठिकाणच्या स्मशानभूमीत तर चक्क प्लॉट पाडून त्याची नियमबाह्यरित्या विक्री केल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रक्रियेत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता स्मशानभूमीही सुरक्षीत नसल्याचे दिसून येते.कब्रस्थानाचाही प्रश्न ऐरणीवरजवाहरनगर : हिंदूंच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची जागा जशी राखीव ठेवण्यात येते, तशीच मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्थानची गरज असते. असे असले तरी अनेक गावांमध्ये तिथे स्मशानभूमी आणि कब्रस्थानसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे वाद निर्माण होतात. काही ठिकाणी कब्रस्थान असले तरी तिथे कुठलिही सुविधा निर्माण करुन देण्यात आली नाही. त्यामुळे समस्या कायम राहत आहेत. ठाणा पेट्रोलपंप येथे कब्रस्थानची मागणी दुर्लक्षित असल्याने जवाहरनगर येथील अब्दुल मजीत शेख यांचे २ मार्चला निधन झाले. कब्रस्थान नसल्यामुळे संतप्त मुस्लिम बांधवांनी पार्थिवच ग्रामपंचायत कार्यालयात आणले होते.