शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी ज्येष्ठांच्या सेवेत दाेन बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 05:00 IST

भंडारा शहरात काेराेना संसर्ग वाढायला लागला आहे; मात्र त्यानंतरही ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. यातील मुख्य अडचण म्हणजे लसीकरण केंद्रापर्यंत जाणे आणि तेथून घरी परत येणे हाेय. ही बाब नगर परिषदेच्या लक्षात येताच दाेन स्कूलबसची व्यवस्था करण्यात आली. आयुध निर्माणीने या दाेन बस नगर परिषदेला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देनगर परिषदेचा पुढाकार : वाॅर्डावाॅर्डातून आणले जाते लसीकरण केंद्रावर

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लसीकरण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पाेहाेचण्यासाठी अडचण लक्षात घेता भंडारा नगर परिषदेने शनिवारपासून दाेन बसेस ज्येष्ठांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. वाॅर्डावाॅर्डातून वृद्धांना लसीकरण केंद्रावर आणून त्यानंतर घरीही साेडून दिले जात आहे. शहरातील नागरी प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरणाला प्रारंभ झाला असून, शनिवारी तब्बल २०० ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. भंडारा शहरात काेराेना संसर्ग वाढायला लागला आहे; मात्र त्यानंतरही ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. यातील मुख्य अडचण म्हणजे लसीकरण केंद्रापर्यंत जाणे आणि तेथून घरी परत येणे हाेय. ही बाब नगर परिषदेच्या लक्षात येताच दाेन स्कूलबसची व्यवस्था करण्यात आली. आयुध निर्माणीने या दाेन बस नगर परिषदेला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसेस वाॅर्डावाॅर्डात जावून वृद्धांना लसीकरण केंद्रापर्यंत आणत आहेत. यासाठी त्या प्रभागाचे नगरसेवकांचे सहकार्य घेतले जात आहे, तसेच बस पाेहाेचल्यानंतर दवंडी देऊन नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले जाते.भंडारा शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयानंतर नगर परिषदेच्या नागरी प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी वृद्धांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, शामियाना टाकण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था असून, तेथे दाेन स्वयंसेवक ज्येष्ठांना सहकार्य करीत आहेत. शनिवारी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. शनिवारी तब्बल दाेनशे नागरिकांना काेराेना लस देण्यात आली. नाेडल अधिकारी डाॅ. मनिषा कुंभारे यांच्या मार्गदर्शनात राहूल देशमुख, संग्राम कटकवार आणि नगर परिषदेचे कर्मचारी यासाठी सहकार्य करीत आहे.

प्रत्येक वाॅर्डात काेराेना चाचणी सुविधाभंडारा शहरातील प्रत्येक वाॅर्डात राेटेशन पध्दतीनुसार काेराेना चाचणी सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दरराेज एक हजार नागरिकांची चाचणी घेण्याचे उद्दिष्ट आहे. भंडारा शहरात वाढता काेराेना प्रादूर्भाव राेखण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला असून लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

ज्येष्ठ नागरिकाच्या लसीकरणासाठी नगर परिषदेने निशुल्क बसची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, यासाठी नगरसेवक सहकार्य करीत आहे. परिसरातील नागरिकांनीही पुढाकार घेवून वृध्दांना लसीकरणासाठी मदत करावी.- विनाेद जाधवमुख्याधिकारी भंडारा

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस