शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तिथे फेकली जातात मृत जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:16 IST

वस्तू महाग आणि जीवन स्वस्त आहे की काय? या अर्विभावात नगरपालिका प्रशासनाचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाच्या हद्दीत येणाऱ्या शहराच्या सीमावर्ती भागात चक्क मृत जनावरे फेकली जात असून वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देजुन्या राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार : वायू प्रदूषणामुळे आरोग्याला धोका

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वस्तू महाग आणि जीवन स्वस्त आहे की काय? या अर्विभावात नगरपालिका प्रशासनाचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाच्या हद्दीत येणाऱ्या शहराच्या सीमावर्ती भागात चक्क मृत जनावरे फेकली जात असून वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व देऊन केंद्र शासनाने चार वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ केला. याची सुरूवात घराघरातून करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, व्यापरी प्रतिष्ठाने, सर्वजनिक ठिकाणे यासह सर्वच महत्वपूर्ण केंद्रांवर स्वच्छतेचा ध्यास हा मूलमंत्र देऊन अभियानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र भंडारा शहर याला अपवाद ठरत आहे. राष्ट्रीय स्वच्छता अभियानात राज्य पातळीवर ५० व्या क्रमांकावर असलेल्या भंडारा शहराला समाधान मानावे लागले.शहराच्या अंतर्गत भागातही हवी तेवढी स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. यासाठी केवळ पालिका प्रशासन जबाबदार नाही. शहरातील नाल्यासह रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहे.भंडारा शहरात पुर्वेकडून एण्ट्री करीत असताना दुर्गंधीमुळे स्वच्छतेबाबत भंडाराकरांची मान आपसुकच खाली जाते. बैल बाजार परिसर ते टी-पार्इंटपर्यतच्या भागात शहरात मृत जनावरे आणून येथे फेकून दिली जातात. यासह सडलेला भाजीपाला व अन्य कचराही राजरोसपणे तिथेच फेकला जात आहे. नगर पालिका प्रशसानाने टी-र्पांटजवळील डाव्या बाजुकडील जागा मारबत दहनासाठी ठरवून दिली असून त्याच ठिकाणी ‘कचरा फेकू नये’ असा फलकही लावण्यात आलेला आहे. जिथे फलक तिथेच सर्वात जास्त कचरा फेकला जात असल्याचे दृष्य भंडाऱ्यात पहावयास मिळत आहे.परिसरातील नागरिक त्रस्तजुन्या राष्ट्रीय महामार्र्गाहून येत असताना उजव्या बाजुला ग्रामसेवक कॉलनी आहे. याच कॉलनीसमोर बीटीबी सब्जी मंडी, जलशुद्धीकरण केंद्र आहे. ग्रामसेवक कॉलनीला लागुनच प्रोफेसर कॉलनी, शासकीय धान्य गोदाम व बाजुला जिल्हा सामान्य रूग्णालय आहे. जुन्या महामार्गावरील दुर्गधींचा सर्वात जास्त त्रास येथील कॉलनीवासियांना सहन करावा लागतो. येथुन रहदारी करताना तोंडावर रूमाल घेऊनच जावे लागते. वायुप्रदुषणामुळे विविध आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.