शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘डीसी रूल’चा प्रस्ताव तातडीने निकाली काढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:01 IST

राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांमध्ये समाविष्ठ असणाऱ्या १४ शहरांसाठी राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने सन २०१७ मध्ये स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केली होती. परंतु या नियमावलीमध्ये मोठ्या प्रमाणात तृटी असल्याने त्यामध्ये सुधारणा करीत फेरफार करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे ऑक्टोबर २०१८ मध्ये सादर करण्यात आला. तेव्हापासून हा प्रस्ताव धूळखात पडून आहे.

ठळक मुद्देबांधकाम व्यवसाय ठप्प : क्रेडाई संघटनेची राज्य शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील तत्कालीन भाजप सरकारच्या कार्यकाळात समान विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल) चा तिढा निर्माण झाला होता. त्यावर मार्ग काढण्यासाठी आघाडी सरकारने फेब्रुवारी महिन्यात बैठक आयोजित केली होती. तुर्तास कोरोनाच्या संकटामुळे त्यावर ठोस निर्णय होवू शकला नसल्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला असून हा प्रस्ताव राज्य शासनाने तातडीने निकाली काढण्याची मागणी बांधकाम क्षेत्रातील क्रेडाई संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांमध्ये समाविष्ठ असणाऱ्या १४ शहरांसाठी राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने सन २०१७ मध्ये स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केली होती. परंतु या नियमावलीमध्ये मोठ्या प्रमाणात तृटी असल्याने त्यामध्ये सुधारणा करीत फेरफार करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे ऑक्टोबर २०१८ मध्ये सादर करण्यात आला. तेव्हापासून हा प्रस्ताव धूळखात पडून आहे.यासंदर्भात क्रेडाई संघटनेच्या वतीने विद्यमान आघाडी सरकारला निवेदन देण्यात आल्यानंतर बांधकाम व्यवसायाशी निगडीत राज्यातील सर्व घटकांची संयुक्तीक बैठक फेब्रुवारी २०२० मध्ये नगरविकास विभागात आयोजित करून समान डिसी रूलच्या संदर्भात माहिती देण्यात आली होती. त्या बैठकीत पार पडलेल्या चर्चेनुसार नियमावलीचे सुधारित पुस्तक तयार करण्यात आले होते. मात्र अद्यापही नियमावली प्रसिद्धी करण्यात आली नाही. या नियमावलीचे मुळ प्रारूप मार्च २०१९ मध्ये राजपत्रामध्ये जाहीर केले होते. त्यावेळी या प्रारूपावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. विद्यमान राज्य शासनाने समान विकास नियंत्रण नियमावली तातडीने लागू केल्यास ठप्प पडलेल्या बांधकाम व्यवसायाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा के्रडाई भंडाराचे जिल्हाध्यक्ष विजय निखार यांनी शासनाकडे निवेदनातून केली आहे.तर आतापर्यंत तिढा निकाली निघाला असतातत्कालीन राज्य सरकारच्या कार्यकाळात विकास नियंत्रण नियमावलीच्या मुद्यावरून संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. त्यानंतर समान डिसीरूलचा प्रस्ताव लागू न होण्यामागे २०१९ मधील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, नवीन सरकार स्थापनेसाठी झालेला विलंब व आता कोरोनामुळे बांधकाम क्षेत्राला ग्रहण लागल्याची परिस्थिती आहे.