शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपटलावरील अस्वस्थ जाणीवा प्रगट करण्याचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:18 IST

‘प्रेम म्हणजे पे्रम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. प्रेमाची अनुभूती घेतली नाही असा कुणी आढळणार नाही. मात्र अलीकडे डे संस्कृतीत व्हॅलेंटाईनचा बोलबाला आहे. व्हॅलेंटाईन वीक साजरा करणाऱ्या तरुणाईला ओढ लागली आहे ती १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन डेची.

ठळक मुद्देआज व्हॅलेंटाईन डे : तरुणाईत उत्साह, हळव्या प्रीतीची बिजे

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : ‘प्रेम म्हणजे पे्रम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. प्रेमाची अनुभूती घेतली नाही असा कुणी आढळणार नाही. मात्र अलीकडे डे संस्कृतीत व्हॅलेंटाईनचा बोलबाला आहे. व्हॅलेंटाईन वीक साजरा करणाऱ्या तरुणाईला ओढ लागली आहे ती १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन डेची. मनपटलावरील अस्वस्थ जाणीवांना कलात्मक पद्धतीने प्रगट करण्यासाठी तरुणाई आसुसली आहे.गत काही वर्षांपासून महानगरात साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे गाव खेड्यापर्यंत पोहचला आहे. प्रेमाचे प्रगटीकरण करण्याचा हा हक्काचा दिवस खास तरुणाईत उत्साहाने साजरा होतो. अलीकडे व्हॅलेंटाईन सप्ताह साजरा होवू लागला आहे. ७ फेब्रुवारीपासून एकापाठोपाठ एक डे साजरे होत आहे. ७ फेब्रुवारीला रोझ डे, त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमीस डे, किस डे, हग डे साजरे होतात. आणि या सर्वांचा शेवट होतो व्हॅलेंटाईन डे ने.तरुणाई वर्षभर या दिवसाची चातकासारखी प्रतिक्षा करीत असतात. जीवलगाचा प्रत्यक्ष होकार मिळविण्यासाठी कोणताही धोका नको म्हणून आदीपासून वातावरण निर्मीती केली जाते. जगभरात या दिवशी प्रेमाला भरते आलेले असते. शहरी तरुणाई या दिवशी उत्साहात दिसून येते. शाळा महाविद्यालयाचे वातावरणही गुलाबी होऊन जाते, असा हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी गुलाब पुष्पांची उधळण केली जाते. प्रेम म्हणजे केवळ प्रियशीसोबत असलेले नव्हे. तर आई, बहिण, भाऊ मित्र मैत्रीणी कुणीही असू शकतात. मनाचा हळव्या प्रितीला अलगदपणे उकलत जाणारा हा दिवस होय.भारतीय संस्कृतीत अशा दिनाला फारसे महत्व नाही. परंतु जागतिकीकरण आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून आता हा दिवस गावखेड्यात पोहचला आहे. यातून अनेकदा भानगडी निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु प्रेमात सर्व काही क्षम्य असत.गुलाब पुष्पांच्या रंगाचे महत्वगुलाब पुष्प हा प्रेमाचे प्रतीक असले तरी त्याच्या रंगावरुन तो कुणाला दायचा हे ठरविले जाते. पिवळ्या रंगाचा गुलाब मित्र मैत्रिणींना दिला जातो. नारंगी रंगाचा गुलाब ज्या व्यक्तीकडे इच्छा व्यक्त करायची आहे त्याला. तर पांढरा गुलाब ज्या व्यक्तीला आपण दुखावले आहे त्याला आणि लाल रंगाचा गुलाब खास प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी दिला जातो.