शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या न्यायासाठी मुलीचे उपोषण

By admin | Updated: June 1, 2017 00:30 IST

पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या दडपशाही धोरणामुळे वडसा येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता देवनाथ नंदनवार यांना २२ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही.

प्रकरण पाटबंधारे विभागाचे : नंदनवार कुटुंबीयांनी पुकारला प्रशासनाविरुध्द एल्गार लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या दडपशाही धोरणामुळे वडसा येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता देवनाथ नंदनवार यांना २२ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. याबाबत त्यांनी वेळोवेळी वरिष्ठांना पत्रव्यवहार केला. मात्र दखल घेतली नाही. त्यामुळे नंदनवार यांनी आज बुधवारपासून भंडारा सिंचन मंडळ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. वडिलांना न्याय मिळावा यासाठी त्यांच्या दहा वर्षीय चिमुकलीनेही उपोषण सुरु केले आहे.इडियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागीय वडसा येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले देवनाथ नंदनवार यांच्यावर विभागीय अधिकारी टी. के. मेंढे, कार्यकारी अभियंता एच. वाय. छप्परघरे यांनी वेळोवेळी अन्याय केल्याची ३२४ पानांची तक्रार नंदनवार यांनी वरिष्ठांना केली आहे. या उपरांतही त्यांना न्याय मिळाला नाही. आॅगस्ट २०१४ ते नोव्हेंबर २०१४, आॅगस्ट २०१५ ते डिसेंबर २०१५, फरवरी २०१६, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ अशा २२ महिन्यांचे वेतन व भत्ते अधिकाऱ्यांनी अडविले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीचे व कर्जाचे डोंगर वाढले आहे. या अन्यायाविरुध्द नंदनवार यांनी गिरोला पहाडी येथील भंडारा सिंचन मंडळ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.वडिलांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळावा यासाठी देवनाथ नंदनवार यांची दहा वर्षीय चिमुकली निहारिका व त्यांची पत्नी अर्चना याही उपोषणाला बसल्या आहेत. दहा वर्षीय चिमुकलीने वडिलांच्या न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. प्रशासनाने चिमुकलीच्या उपोषणाची दखल वेळीच घेवून नंदनवार यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. उपोषणादरम्यान नंदनवार कुटुंबियाच्या जीवीताला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.