शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

उर्समधून हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 22:45 IST

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या हजरत औलिया चाँदशहा बुखारी (र.अ.) यांचा उर्स जल्लोषात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देशेकडो वर्षांची परंपरा : पवनीत चाँदशहा वलीचा उर्स उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या हजरत औलिया चाँदशहा बुखारी (र.अ.) यांचा उर्स जल्लोषात साजरा करण्यात आला. या उर्समधून पवनीत हिंदू-मुस्लीम बांधवांच्या एकतेचे दर्शन बघायला मिळाले.दुसºया दिवशी चादर कार्यक्रमात आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांनीही यावेळी हजेरी लावून बाबांना फुले अर्पण करून आशीर्वाद घेतला. शुक्रवारला नमाज पठननंतर हजरत शहीद-ए-मिल्लत सय्यद ममरेज खाँ यांच्या दरगाह वरून संदल शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली.यामध्ये मुरीद व फकीर यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यावेळी ठिकठिकाणी चौकात मुरीद व फकीर यांनी तलवार, खंजीरचे वार आपल्या अंगावर करणे, सळई वा जाड तारा खुपसणे या सारखे थरारक प्रकार यावेळी केले.मात्र, औलिया पीर परंपरेच्या करामतीमुळे रक्ताचा एकही थेंब निघाला नाही, हे यांचे वैशिष्ट्य. हा रातिफचा सोहळा ढोल ताशे, नगारे यांच्या वादनात मोठ्याा उत्साहात संपन्न झाला. सर्वधर्मीय लोक यावेळी सहभागी झाले होते. सायंकाळी ६ वाजता फुलांच्या चादरी अर्पण केल्या गेल्या व प्रमुख मान्यवाराना कमेटी तर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.उर्स कमेटीच्या वतीने लंगरचे आयोजन करण्यात आले होते. यात हिंदु-मुस्लिम बांधवांकरिता पूर्ण गावाला व पाहुण्यांना भोजन दिले गेले, या कार्यक्रमानंतर पहाटेपर्यंत कव्वालीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. त्यास हजारो चाहत्यांची हजेरी होती.समाजातील चाहत्यांनी मोठा जल्लोष केला होता. तिसºया दिवशी शनिवारला सकाळी कुल फातेहाच्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. असा हा हजरत औलिया पीर चाँद शाह बुखारी (र.अ.) यांचा उर्स दरवर्षी प्रमाणे यंदाही हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोप्याने साजरा केला. बरीचशी मंडळी राज्य व बाहेर राज्यातून खास उरूससाठी आले. कार्यक्रमासाठी ऊर्स कमेटीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य केले.