शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पुलावरून धोकादायक वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 21:31 IST

वैनगंगा नदीवर असलेल्या जुन्या पुलावरील वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातल्यानंतरही या पुलावरुन पादचारी व दुचाकींची धोकादायक वाहतूक सुरू आहे. या पुलावर अनेकदा अपघात घडले असून जिवितहानीसुद्धा झाली आहे. नागरिक मोठ्या पुलापेक्षा जुन्या पुलावरुनच वाहतुकीला प्राधान्य देत आहेत.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता : कठडे असुरक्षित, रात्रीला अंधार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीवर असलेल्या जुन्या पुलावरील वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातल्यानंतरही या पुलावरुन पादचारी व दुचाकींची धोकादायक वाहतूक सुरू आहे. या पुलावर अनेकदा अपघात घडले असून जिवितहानीसुद्धा झाली आहे. नागरिक मोठ्या पुलापेक्षा जुन्या पुलावरुनच वाहतुकीला प्राधान्य देत आहेत.वैनगंगा नदीवरील लहान पुल ब्रिटीशांनी १९२९ मध्ये बांधला होता. या पुलाची वयोमर्यादा संपत आल्याने त्याच्या बाजूलाच नवीन पूल तयार करण्यात आला आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक याच नवीन पुलावरून होत असते. परंतु, नवीन पूल तयार झाला तरी जुना पुल मात्र वाहतुकीस सुरू आहे.आॅगस्ट २०१६ मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुल कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी पाईप टाकून वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु, स्थानिकांना आवागमन करण्यास जुना पूल सोयीचा होत असल्याने लोखंडी पाईप काढण्यात आले.सध्या या पुलावरुन जड वाहतूक बंद असली तरी पादचारी व दुचाकींची वाहतूक सुरू आहे. ९० वर्ष वयोमान झालेल्या या पुलाचे लोखंडी कठडे जीर्ण झाले आहेत. कधी-कधी या कठड्यांना एकमेकांसोबत तारांनी जोडले जाते. रात्रीला या पुलावर सर्वत्र अंधार असतो.चार वर्षापूर्वी रात्रीच्या सुमारास एक चारचाकी वाहन जुन्या पूलावरून नदीत कोसळले होते. यात वाहनातील सर्वांनाच जलसमाधी मिळाली होती. या पुलावरुन धोकादायक वाहतूक सुरू असून महाड व मुंबईसारख्या घटनांची पुनरावृत्तीची शक्यता व्यक्त केली जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.