शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मार्गावर पाण्यातून वाहनांचा धोकादायक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:06 IST

रामटेक-गोंदिया राज्य मार्गावर सखल भागात रपटा आहे. सतत पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. दीड ते दोन फुटापेक्षा जास्त पाणी वाहत आहे. वाहनांचा सदर रस्त्यावर धोकादायक प्रवास सुरु आहे. रपटा व रस्ता पाण्याने समतल झाल्याने रस्ता कुठे आहे ते वाहनधारकांना दिसत नाही. पाण्याचा प्रवाहाची गती जास्त आहे. सदर रस्ता मोठा वर्दळीचा आहे.

ठळक मुद्देरामटेक-गोंदिया राज्यमार्ग : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, वर्दळीचा रस्ता

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रामटेक-गोंदिया राज्य मार्गावर सखल भागात रपटा आहे. सतत पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. दीड ते दोन फुटापेक्षा जास्त पाणी वाहत आहे. वाहनांचा सदर रस्त्यावर धोकादायक प्रवास सुरु आहे. रपटा व रस्ता पाण्याने समतल झाल्याने रस्ता कुठे आहे ते वाहनधारकांना दिसत नाही. पाण्याचा प्रवाहाची गती जास्त आहे. सदर रस्ता मोठा वर्दळीचा आहे.गत २४ तासात तुमसर तालुक्यात संततधार सुरु आहे. तुडका, तामसवाडी शिवारात एक रपटा तुडूंब भरून वाहत आहे. रामटेक गोंदिया राज्यमार्ग मोठा वर्दळीचा असून जड वाहने व लहान वाहनाचा पाण्याच्या प्रवाहातून वाहतूक करणे सुरु आहे. रपटा व रस्ता पाण्यामुळे एकच दिसत आहे. पाण्याचा प्रवाहाची गती जास्त आहे. दुचाकीस्वारांचा जीव येथे धोक्यात आहे.रपट्यला सुरक्षा कठडे नाही. त्यामुळे रस्ता कुठे आहे. याचा अंदाज येत नाही. रपट्याच्या पुढे वळण आहे. त्यामुळे नेमक्या रस्त्याचा अंदाज येथे चुकतो. रात्रीला वाहनधारकांना येथे बराच वेळ थांबावे लागते. स्थानिकांना विचारल्यावरच वाहनधार येथून पुढे जातात. प्रथमदर्शनी हा मोठा नाला तर नाही ना असा प्रश्न पडतो. बाजूला शेतशिवारात पाणीच पाणी असल्याने वाहनधारक येथे थांबतात. सोमवारी रात्री अनेक वाहने येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी होती.सार्वजनिक बांधकाम विभागाने रपट्यावर पुल बांधकाम करण्याची गरज आहे. किमान रपट्यावर सुरक्षेकरिता कठडे तयार करणे गरजेचे आहे. मागील अनेक वर्षापासून पावसाळ्यात वाहनधारकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.सुरक्षित प्रवासाची हमी सार्वजनिक बांधकाम विभाग देतो. परंतु येथे तो विसर पडलेला दिसत आहे. रात्री येथे किमान चौकीदार ठेवण्याची गरज आहे. महत्वपूर्ण रस्त्याचा येथे संबंधित विभागाला विसर पडलेला दिसत आहे. विभागाचे कार्यालय येथून केवळ तीन कि.मी. अंतरावर आहे हे विशेष. इतर रस्त्याची काय काळजी घेत असतील हा संशोधनाचा विषय आहे. संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.रस्ता सुरक्षिततेची हमी शासन घेते. येथे रामटेक गोंदिया महत्वपूर्ण रस्ता पाण्याखाली आला आहे. रपट्याचे पुलात रुपांतर बांधकाम विभागाने का केले नाही. अपघाताला संबंधित विभागालाच जबाबदार ठरवावे लागेल.-डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर.