शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचाऱ्यांच्या संपाने जंगलाची सुरक्षितता धोक्यात

By admin | Updated: August 25, 2014 23:47 IST

जंगलाची सुरक्षितता ज्यांच्या हातात आहे, अशा वनकर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. यात जिल्ह्यातील वनपाल, वनरक्षक व वनकामगार सहभागी

भंडारा : जंगलाची सुरक्षितता ज्यांच्या हातात आहे, अशा वनकर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. यात जिल्ह्यातील वनपाल, वनरक्षक व वनकामगार सहभागी झाल्याने जंगलाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरावर वनरक्षक, वनपाल यांचे अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधारणा करणे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शासन दरबारी खेटा घातल्या. मात्र राज्य शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या भंडारा शाखेच्या माध्यमातून भंडारा येथील उपवन संरक्षक कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू केला आहे. भंडारा जिल्ह्यातील वनकर्मचाऱ्यांनी या संपात सक्रीय सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यातील ५७ वनपाल, १९९ वनरक्षक व २८० वनकामगार असे ५३६ वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधारणा करणे, इतर विभागांना मिळालेला निश्चित प्रवास भत्ता वनकर्मचाऱ्यांनाही मंजूर करणे, पोलीस विभागाप्रमाणे वनकर्मचाऱ्यांनाही सोयी-सवलती व भत्ते देण्यात यावे, वनसंरक्षणात कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याच्या कुटूंबियांना १० लाखांची नुकसान भरपाई देण्यात यावी, बीट वनरक्षक वनसंरक्षणाचे व्यतिरिक्त जास्तीचे काम देवू नये, २४ तासाच्या सेवेऐवजी आठ तासांची सेवा करावी व रजा राखीव पदाची निर्मिती करावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. भंडारा शाखेच्यावतीने विजय मेहर, टी.एच. घुले, पी.व्ही. घुले, मिलिंद घोरमोरे, बी.टी. बागडे, यु.बी. हटवार, सय्यद शकील, आय.एच. काटेखाये, ए.एन. नरडंगे, बी.एल. डोरले, गौरी नेवारे, ए.यु. बडोले, उचिबगले आदींच्या नेतृत्वात हा संप सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)