शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

न्याय मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचे धरणे

By admin | Updated: March 31, 2016 00:54 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी इंदिरा सागर गोसेखुर्द प्रकल्प परीसरातील राजीव गांधी टेकडीवर गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने ....

चिचाळ : विदर्भातील महत्वाकांक्षी इंदिरा सागर गोसेखुर्द प्रकल्प परीसरातील राजीव गांधी टेकडीवर गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने शेकडो प्रकल्पग्रस्तांनी धरणे आंदोलन केले. विविध समस्यांचे निवेदन तहसिलदार एस.डी. कांबळे व ठाणेदार मधुकर गिते यांना निवेदन देवून न्याय मागणी केली आहे.गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत मौजा गोसेखुर्द व मौजा गोसी बु. या गावातील तसेच इतर गावातील भूमिसंपादन अधिनियम १८९४ नुसार संपादीत केलेल्या खातेदारांना १८ जून २०१३ च्या शासन निर्णयानुसार विशेष आर्थिक पॅकेजचा लाभ देण्यात यावा, प्रकल्पात पुनर्वसनासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादीत केली आहे. त्या शेतकऱ्यांना २०१३ चे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे, तसेच कॅनलसाठी संपादीत केलेल्या शेतजमीन धारकांना ही २०१३ पॅकेजचा लाभ देण्यात यावा, पाथरी पुनर्वसनस्थळी रस्त्यावर आलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, पूर्व ले-आऊटचे मोजमापन करून सिमांकन करण्यात यावे, गावाला संपूर्ण तारेचा सुरक्षा कुंपण करण्यात यावे, पुनर्वसन स्थळी सोडलेली जमीन संपादित करून पाथरी गावाच्या उपयोगासाठी आणावी, धरणासाठी ज्या शेतातील माती आणलेली आहे, त्या शेतकऱ्यांना मोबदल्याचे पुनर्वसन २०१३ पॅकेजचा लाभ द्यावा, ज्या शेतकऱ्यांची उपजिवीका भागविणारी शेती प्रकल्पाच्या कुठल्याही कामासाठी शेती संपादित केली असेल किंवा जागा संपादित केली असेल त्या सर्व खातेदारांना पॅकेजचा लाभ देण्यात यावा, गोसेखुर्द परिसरातील सर्व वहिवाटीचे रस्ते दुरूस्त करून देण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांच्या दुरूस्तीला व उपलब्धतेला प्राधान्य देण्यात यावे व दुरूस्ती तात्काळ करण्यात यावी.भुसंपादन प्रकरणातील मोबदला पुनर्वसन अनुदान, नागरिसुविधा व २०१३ च्या पॅकेजमधील वाटपाच्या अंमलबजावणीतील त्रृटीमुळे व प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे प्रकल्पग्रस्तांना योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने अनेक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना विनाकारण त्रास व मनस्ताप सहन करावा लागतो आहे. हा मनस्ताप संतापात व्यक्त होऊ शकतो याची वरिष्ठांनी नोंद घ्यावी आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.धरणे आंदोलनाला गोसे परिसरातील चिचाळ, सौंदड, पाथरी, कुर्झा, वासेळा, मालची, पेंढरी, सावरला, नेरला आदी गावातील प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. धरणे आंदोलन सभेत विविध विषयार चर्चा करण्यात आली. विविध समस्यांचे निवेदन तहसिलदार एस.डी. कांबळे व ठाणेदार मधुकर गीते यांना निवेदन देण्यात आले.यावेळी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती संयोजक विलास भोंगाडे, दादा आगरे, शेखर रामटेके, गुलाब उके, सिताराम रेहपाडे, गुणवंत तागडे, शिवशंकर माटे, माणिक दुबे, शेखर मेश्राम, रमेश भेंडारकर, नरेंद्र बिलवणे, वामन भोयर, केशव नखाते, भिमराव भिमटे, सुदाम मेश्राम, राजानंद वानखेडे, पांडू चन्ने, गोमा भेंडारकर, परसराम काटेखाये, श्रीराम भेंडारकर, माधो आगरे, रामरतन काटेखाये, विनोद नखाते, केशव भुरे, राजु मेश्राम, देवराम मोहरकर आदी उपस्थित होते. यावेळी पवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मधुकर गीते यांचा कडक बंदोबस्त होता. (वार्ताहर)