शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

पवनीतील पर्यटन संकुलाची दैनावस्था

By admin | Updated: November 17, 2015 00:40 IST

तालुक्यातील पर्यटन स्थळ व भेटी देणारे पर्यटक यांचा विचार करुन शासनाने निसर्गरम्य बालसमुद्र तलावाच्या काठावर पर्यटन संकुल मंजूर केले.

शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष : कोट्यवधी रुपयांची वास्तू ठरत आहे ‘शो-पीस’, पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर अशोक पारधी पवनी तालुक्यातील पर्यटन स्थळ व भेटी देणारे पर्यटक यांचा विचार करुन शासनाने निसर्गरम्य बालसमुद्र तलावाच्या काठावर पर्यटन संकुल मंजूर केले. पर्यटन संकूलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले. कंत्राटदाराला कामाचे देयक न मिळाल्यामुळे किरकोळ काम रखडले आहेत. त्यामुळे हस्तांतरणाची प्रक्रीया रखडली आहे. सध्या बांधकाम झालेल्या पर्यटन संकूलाची दैनावस्था सुरु झाली आहे.प्राचीन व ऐतिहासीक वारसा असलेले पवनी नगर विदर्भाची काशी म्हणून संबोधल्या जाते. व्यापारासाठी भूतकाळात प्रसिध्द असलेल्या नगराचे संरक्षणासाठी मानवनिर्मित इंग्रजी 'यु' आकाराची संरक्षण भिंत व जवाहर गेटपासून काही अंतरापर्यंत भिंतीवर बांधलेली तटबंदी, परकोट (किल्ला), विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असेलेले पंचानन गणेश (सर्वतोभद्र) किंवा पंचमुखी गणेश, धरणीधर गणेश मंदिर, वैजेश्वर देवस्थान, मुरलीधर मंदिर, गधादेव, जगन्नाथ मंदीर, दिवाणघाट, वैजेश्वर घाट, पुरातत्व विभागाने उत्खनन करुन शोभलेले मंडप, बुध्द स्तुप व त्याचे अवशेष, चंडीका मंदिर, विठ्ठल रुखमाई मंदिर, दत्त मंदिर, राम मंदिर, देम्बेस्वामी साधना मंदिर व शिल्पकतेचा उत्तम नमुना असलेले गरुड खांब तसेच गोसीखुर्द धरण, कऱ्हांडला पवनी अभयारण्य, रुयाळ येथील महासमाधीभूमी परिसर, कोरंभी डोंगरावरील महादेव मंदिर, ठाणा येथील निसर्गरम्य चंडीकामंदिर व अभयाण्यामुळे प्रवेशास बंदी असलेले ढिवरढुटी असे अनेक पर्यटक स्थळ पवनी तालुक्यात आहे.ही सर्व स्थळे एका दिवसात पाहणे शक्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यटन मंत्रालयाने पवनी येथे ७ वर्षांपूर्वी पर्यटन संकूल प्रस्तावित करुन बांधकाम सुरु केले. थाटात भुमिपूजन झाले. अल्पावधीत बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन तत्कालीन मंत्र्यानी दिले. पंरतु लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही, अशी म्हण आहे. अगदी तसेच पर्यटन संकुलाचे बाबतीत झाले.कोट्यवधीचे हे पर्यटन संकूल बांधून तयार आहे. पर्यटकाना रमवेल असे स्थळ निवडण्यात आले. परंतु शासनाचे दुर्लक्षामुळे कोट्यवधी रुपये खर्च झालेली इमारत धुळखात पडलेली आहे. छतावर स्लॅप ऐवजी टीनपत्रे वापरली असल्याने ती उडू लागली आहेत. पावसाचे पाणी गळून सिलिंगचे पिओपी गळून पडत आहे.झालेली रंगरंगोटी खराब होत आहे. पर्यटन विभाग या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने पर्यटकात नाराजीचा सूर आहे. पर्यटन संकूल पर्यटकांच्या सेवेसाठी लवकर सुरु करावे, अशी मागणी जोर धरत आहे.