शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

देशाचे भविष्य तरुणांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:29 IST

संगणक हे जगातील ज्ञानाची खिडकी आहे. त्या ज्ञानाचा शोध घेऊन अभ्यासूवृत्ती निर्माण करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देमनोज सूर्यवंशी : लोकमत स्पर्धा परिक्षा लेखमालेचे विमोचन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संगणक हे जगातील ज्ञानाची खिडकी आहे. त्या ज्ञानाचा शोध घेऊन अभ्यासूवृत्ती निर्माण करणे गरजेचे आहे. खºया अर्थाने भारताचे भविष्य तरुण पिढीच्या हातात आहे. संयम ठेऊन एकाग्रचित्ताने अभ्यास केल्यास कुठल्याही स्पर्धा परिक्षेत हमखास यश मिळू शकते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले.लोकमतमध्ये प्रकाशित स्पर्धा परीक्षाविषयक लेखमालेच्या विमोचनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रम भंडारा येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात शुक्रवारला सकाळी आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी जे.एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे होते. विशेष अतिथी म्हणून तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, जिल्हा माहिती अधिकारी रविकुमार गीते, वाणिज्य विभागप्रमुख प्रा.राहुल मानकर, प्रा.किरणकुमार वसानी उपस्थित होते.यावेळी डॉ.ढोमणे म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी कधीही शॉर्टकटचा वापर करु नका. चिकाटीने व मेहनतीच्या बळावर विद्यार्थ्यांनी आशावाद दृष्टीकोनातून यश प्राप्त करावा. सामाजिक बांधिलकी लोकमत समुहाने जपली आहे, ती वाखाणन्याजोगी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी एसडीपीओ विक्रम साळी म्हणाले, प्रशासकीय सेवेत यायचे असेल तर आतापासूनच विद्यार्थ्यांनी तयारीला लागले पहिजे. आपल्या अनुभवातून साळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एमपीएससी, युपीएससी, स्टॉफ सिलेक्शन, बँकीग व अन्य स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविणे कठिण असले तरी ते अशक्य मात्र मुळीच नाही. केवळ प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले.यावेळी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित स्पर्धेच्या जगातील या लोकमत वृत्तपत्रातील स्पर्धा परिक्षा सदराचे विमोचन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. संचालन जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर परसावार यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सोनु शर्मा यांनी केले. या कार्यक्रमासाठी लोकमतचे प्रतिनिधी इंद्रपाल कटकवार, वितरण प्रतिनिधी विजय बन्सोड, जाहिरात प्रतिनिधी विनोद भगत, कर्मचारी रमेश सेलोकर यांनी सहकार्य केले.