शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीबाधितांसाठी ‘त्यांची’ राज्यभरात सायकलभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2017 00:50 IST

एचआयव्हीबाधित अनाथ बालकांचे मुलभूत प्रश्न, शिक्षण, आरोग्य व पुनर्वसनावर जनजागृती करण्यासाठी ...

साकोली : एचआयव्हीबाधित अनाथ बालकांचे मुलभूत प्रश्न, शिक्षण, आरोग्य व पुनर्वसनावर जनजागृती करण्यासाठी होमिओपॅथीक अ‍ॅकेडमी आॅफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक यांनी ८५० किलोमिटरचा गुजरात, राजस्थान व महाराष्ट्र असा सायकल प्रवास पूर्ण केला. त्यांचे साकोली तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.शासकीयस्तरावर महाराष्ट्रातील एचआयव्ही बाधित बालकांना एआरटी केंद्रात मोफत उपचार मिळतात. परंतु त्यांचे पुनर्वसन समाजातील हक्क, शिक्षण त्यांना मुख्य प्रवाहात आणणे व १८ वर्षे पूर्ण झाल्यावर रोजीरोटी व्यवसाय आदी प्रश्न गंभीर होत आहेत. १ डिसेंबर रोजी शासकीयस्तरावर जनजागृती फेरी निघतात. तरीदेखील महाराष्ट्रातील हजारो एचआयव्हीबाधीत बालकांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय होणे गरजेचे आहे. यासाठी माणसा माणसांशी संवाद व्हावा म्हणून डॉ.चांडक हे २०१३ पासून सायकलने जनजागृती करतात. आजवर डॉ. चांडक यांनी मुंबई ते कोकण, परभणी ते पणजी, विदर्भ, परभणी, पंढरपूर, पुणे, महाबळेश्वर असा सायकलने प्रवास केला. राजस्थान व गुजरात राज्यात होणारे कामगारांचे स्थलांतरण व ट्रकचालक महिनोंमहिने कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे असुरक्षित लैंगिक संबंधाच्या शक्यतेमुळे होणारा प्रसार हे एचआयव्ही प्रसाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे या विषयावर जनजागृती व्हावी, सायकलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषणमुक्तीचा संदेश देता यावा, यासाठी सूरत, बडोदा, अहमदाबाद, मेहसाना, पालनपूर, माऊंट आबू, गुरूशिखर, छिंदवाडा, हल्दी की घाटी, उदयपूर, चितोडगड किल्ला या भागात सायकलने प्रवास केला. मुळचे परभणी येथील डॉ.पवन चांडक यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात भेट दिली. साकोलीला भेट दिली असता ते म्हणाले, परभणी येथील ७० एचआयव्हीबाधित अनाथ बालकांचे शिक्षण आरोग्य व पुनर्वसन या मूलभूत गरजांवर काम सुरु असल्याचे सांगितले. साकोली येथे पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी डॉ.चांडक यांचा सत्कार केला. (तालुका प्रतिनिधी)