शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कटक मंडळ प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:33 IST

महाराष्ट्रात एकूण २७ महानगरपालिका व २२८ नगर परिषदा अ, ब आणि क वर्ग अशा तीन वर्गवारीत आहेत. कटक मंडळेसुद्धा ...

महाराष्ट्रात एकूण २७ महानगरपालिका व २२८ नगर परिषदा अ, ब आणि क वर्ग अशा तीन वर्गवारीत आहेत. कटक मंडळेसुद्धा आहेत. ज्यामध्ये शिक्षकांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. संबंधित प्रश्न तातडीने सोडविण्यासंदर्भात शिक्षक सहकार संघटना सतत पाठपुरावा करीत असते. आता शिक्षक सहकार संघटनेने महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री व नगर विकासमंत्री यांना निवेदन दिले. २००५ नंतर नियुक्त मनपा, न.प व कटक मंडळांमधील शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, अ तसेच ब वर्ग नगर परिषदा आणि महानगरपालिका शिक्षकांचे वेतन नगर विकास व शालेय शिक्षण विभागाकडून होत असल्यामुळे दरमहा वेतन उशिरा होते, त्यामुळे हे वेतन दोन विभागांकडून न होता शंभर टक्के वेतन शिक्षण व क्रीडा विभागाकडून प्रदान करणे, शिक्षकांना १०,२०, ३० सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लवकरात लवकर लागू करणे, नगर परिषद व महानगरपालिकेतील जीपीएफ खातेधारक शिक्षकांना शासकीय नियमाप्रमाणे व्याजदर मिळत नाही त्यांचे जीपीएफ खाते हे कोषागारमध्ये नसल्याने त्यांना व्याज बचत खाते मिळत नाही, शिक्षकांना जिल्हा परिषद शिक्षकांप्रमाणे सण अग्रिम मिळत नाही, ते देण्यात यावे, जिल्हा परिषदेप्रमाणे, नगर परिषद व महानगरपालिका शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या कराव्या, बदली झालेल्या शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेचा लाभ देण्यात यावा, बदल्यांसाठी शिक्षण समितीची व सर्वसाधारण सभेच्या ठरावाची गरज असू नये. शिक्षण सेवकांचे मानधन सहा हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यात यावे यासह अन्य मागण्यांचा समावेश होता.

आ. परिणय फुके यांनी मागण्या रास्त असून, त्या त्वरित सोडवाव्यात, असे प्रधान सचिव पाठक यांना सांगितले. शिष्टमंडळात संतोष पिट्टलवाड, विभागीय अध्यक्ष रविकुमार अंबुले, रवी ढगे, सुरेंद्र गौतम, लाखेश्वर लंजे यांचा समावेश होता.