शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शॉपिंगमध्ये ग्राहकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:46 IST

इंटरनेटमुळे व्यवहारांमध्ये सुलभता आली असलीतरी त्याच बरोबर अनेक धोकेही होत आहेत. चोरटेही आता या क्षेत्रात कार्यरत झाल्याची माहिती पुढे येत आहे. केवळ ज्ञान मिळवून शिक्षण घेवून घरबसल्या दरोडा टाकता येत असल्याने चोरीची पद्धतीही बदलली आहे.

ठळक मुद्देकाळानुरूप बदलली पद्धती : आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचीही दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : इंटरनेटमुळे व्यवहारांमध्ये सुलभता आली असलीतरी त्याच बरोबर अनेक धोकेही होत आहेत. चोरटेही आता या क्षेत्रात कार्यरत झाल्याची माहिती पुढे येत आहे. केवळ ज्ञान मिळवून शिक्षण घेवून घरबसल्या दरोडा टाकता येत असल्याने चोरीची पद्धतीही बदलली आहे.शारीरिक कष्ट घेण्यापेक्षा चोरट्यांना आता केवळ वेबसाईट हॅक करण्याचे ज्ञान मिळविणे इतकीच तसदी घ्यावी लागत असल्याने या क्षेत्रातही चोरट्यांची संख्या वाढली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातूनच ऑनलाईन खरेदी दरम्यान अनेक फसवणुकीच्या घटना उजेडात येताना दिसतात. ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काही गोष्टींची खरबदारी घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन म्हणजेच इंटरनेट शॉपिंग करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. घर बसल्या खरेदी असल्यामुळे बाजारातील गर्दी, वेळ आणि इंधनाची बचत होते. परंतु ऑनलाईन शॉपिंग बद्दल लोकांच्या मनात शंकाकुशंका वाढत आहे. अनेकांची यामुळे झालेली फसवणूक आणि आॅनलाईनची विश्वासार्हता यामुळे ग्राहकही अडचणीत येत आहेत.स्वस्तातले स्मार्टफोन व इंटरनेटमुळे सध्या खेड्यातील व्यक्तीही ब्राऊजिंग करुन एकाच प्रकारातील शेकडो प्रॉडक्ट्स ऑनलाईन बघू शकतात. त्यामुळे पारंपरिक दुकानांमध्ये स्टोअर्ससह मॉलमध्ये प्रत्यक्षात जावून होणारा वेळेचा अपव्यय टळू शकतो. आॅनलाईन रिटेंलिंगमुळे खरेदीचा विस्तार झाला आहे. आॅनलाईन रिटेलिंगने खरेदीचे दालन सर्वांसाठी खुले केले आहे. त्यामुळे जे लोक रिटेलिंग पासून दूर होते ते आता जवळ आले आहेत. ऑनलाईन रिटेलर्स ग्राहकांना काहीशा वाजवी दरात विविध वस्तुंची विक्री करतात जे प्रॉडक्ट गावात मिळत नाही त्याचीही खरेदी करणे यामुळे शक्य झाले आहे.वेबसाईट मुळे आपण केव्हाही ऑनलाईन खरेदी करु शकतो. यामुळे जे लोक जायबंदी आहेत अशा लोकांनाही बसल्या जागी वस्तूंची खरेदी करता येते तसेच खरेदी करण्यापूर्वी आपण इंटरनेटवर विविध प्रॉडक्टसबाबत संशोधन तसेच त्यांच्या किंमतीतील तुलना करु शकतो. जे विविध दुकानांना, स्टोअर्सला प्रत्यक्ष भेट देवून करुन घेणे अवघड असते. आॅनलाईन खरेदीचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. ऑनलाईन रिटेलर्स जरी पारंपरिक दुकानाच्या तुलनेत वाजवी दरात प्रॉडक्टसची दुकानांच्या तुलनेत विक्री करीत असले तरीही त्या प्रॉडक्टसच्या दजार्बाबत कुणीही शाश्वती देवू शकत नाही. पारंपरिक दुकानांमध्ये जावून वस्तूची तत्काळ खरेदी केली तर तीवस्तू घरी यायला काही दिवस लागतात. ऑनलाईन वस्तू परत करणे अवघड असते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वाहतुकीचा खर्च द्यावा लागतो.