आसगावात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी : ६९ शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभागपवनी : विज्ञानाचे खुप सारे फायदे असले तरी तोटे देखिल आहेत. हिरोशिमा- नागासाकी किंवा भोपाल येथील गॅस दुर्घटना अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा विज्ञानाचे तोटे झाल्याचे आपण म्हणतो. परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळावर आपण विश्व एकसंघ केलेला आह, जोडलेला आहे. हा विज्ञानाचा फायदा आहे. विज्ञान म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित करून शोधक वृत्ती म्हणजे विज्ञान, असे प्रतिपादन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आसगाव येथे ४१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून अतिथी पं.स. सभापती अर्चना वैद्य, जि.प. सदस्या चित्रा सावरबांधे, पं.स. सदस्य मंगेश ब्राम्हणकर, माधुरी मेश्राम, कल्पना गभणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रभू बगमारे, वनिता हत्तीमारे, माया भेंडारकर, गटशिक्षणाधिकारी निमसरकार, विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे, जि.प. क़ महा. चे प्राचार्य बी.बी. बावणे, राजुबाई भेंडारकर, क़म. प्राचार्य रेखा भेंडारकर, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी, मुख्याध्यापक खेमराज डोये, विपीनचंद्र रायपूरकर, युसुफ बेग यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी निमसरकार यांनी केले. संचालन प्रा. नरेश मोटघरे तर आभार संदीप वहिले यांनी मानले. प्रदर्शनीत ६९ शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले. ६ वी ते ८ वी च्या गटातील प्रथम पारितोषिक प्रकाश हायस्कूल अड्याळच्या हर्षल वाहणे, द्वितीय जि.प. पूर्व माध्य. शाळा भावड येथील धनश्री कोरे, तृतीय शाश्वत विद्या मंदीर कोंढा येथील शाहील भेंडारकर यांनी पटकाविला. ९ वी ते १२ च्या गटातील प्रथम पारितोषिक जि.प. हायस्कूल आसगाव येथील प्रणय सपाटे, द्वितीय विनोद हायस्कूल गोसे येथील क्रांतीलाल बनकर तर तृतीय गांधी विद्यालय कोंढा येथील प्रज्वल देशमुख यांनी पटकाविला. (तालुका प्रतिनिधी)
शोधक वृत्ती जोपासणे म्हणजे विज्ञान
By admin | Updated: December 9, 2015 00:52 IST