शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीटी-1 वाघाने तेजरामला नेले दीड किमी ओढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 23:57 IST

शुक्रवारी सकाळी तेजराम कार माझ्या घरी आला. शेतावर जाऊ असे म्हणाला. आम्ही सकाळी १० वाजताच्या आसपास शेतावर पोहचलो. धान पिकाची पाहणी करून घरी जाण्यासाठी निघालो. त्यावेळी तेजरामला शेळ्यांच्या चाऱ्याची आठवण झाली. तो नाल्याच्या काठावर झाडाच्या फांद्या तोडत होता. मी त्याच्या मागे उभा होतो. अचानक झुडुपातून गुरगुरत एक वाघ तेजरामच्या दिशने झेपावला. थेट त्याची मान जबड्यात पकडली.

दयाल भोवतेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : आम्ही दोघे शेतात गेलाे. धानाची पाहणी केली. तेजरामला शेळ्यासाठी चारा तोडायचा होता. तो नाल्याच्या काठावर झाडाच्या फांद्या तोड होता. मी त्याच्या मागे काही अंतरावर उभा होतो. अचानक झुडुपातून वाघाने झेप घेतली. काही कळायच्या त्याची मान पकडली. माझे अवसान गळाले. पायाला थरथरी सुटली. तरी कसबासा झाडावर चढलो. डोळ्यासमोर वाघाने तेजरामला जबड्यात पकडून दोन नाले पार करत दीड किमी ओढत नेले. अशी आपबिती वाघाच्या हल्ल्यात ठार झालेला शेतकरी तेजराम कार यांचा सहकारी मनोज प्रधान सांगत होता.हल्लेखोर सीटी-१ वाघाने लाखांदूर तालुक्यातील कन्हळगाव शेतात तेजराम बकाराम कार (४५) या शेतकऱ्यावर हल्ला करून शुक्रवारी सकाळी १० वाजता ठार केले. या हल्लेखोर वाघाची ही १३ वी शिकार होती. सीटी-१ वाघाने कन्हळगाव येथील मनोज प्रधान यांच्या समोर हल्ला करून तेजरामला ठार मारले. हा थरार तो सांगत होता तेव्हा त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. मनोज सांगत होता, शुक्रवारी सकाळी तेजराम कार माझ्या घरी आला. शेतावर जाऊ असे म्हणाला. आम्ही सकाळी १० वाजताच्या आसपास शेतावर पोहचलो. धान पिकाची पाहणी करून घरी जाण्यासाठी निघालो. त्यावेळी तेजरामला शेळ्यांच्या चाऱ्याची आठवण झाली. तो नाल्याच्या काठावर झाडाच्या फांद्या तोडत होता. मी त्याच्या मागे उभा होतो. अचानक झुडुपातून गुरगुरत एक वाघ तेजरामच्या दिशने झेपावला. थेट त्याची मान जबड्यात पकडली. आपले अवसान गळाले. तोंडातून शब्दही फुटत नव्हेते.  पाय थरथरत होते. मात्र कुठून शक्ती आली काही समजायच्या आता जवळच असलेल्या एका झाडावर चढलो. वाघने तेजरामची मान पकडून त्याला ओढत नेऊ लागला. दोन नाले पार करून वाघ दिशेनासा झाला. वाघ गेल्याची खात्री झाल्यावर आपण झाडावरून खाली उतरलो, पळतच रस्त्यावर आलो. तेथून आरडाओरड केली. मोबाईलवरून गावात माहिती दिली. गावकरी आले तेव्हा कुठे आपल्या जीवात जीव आला. पण माझा मित्र वाघाने ठार मारला असे सांगत मनोजने आपल्या डाेळ्यातून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वाघाची दहशत दुसऱ्या दिवशीही कायम होती. परिसरातील कुणीही शेतशिवारात गेले नाही. या वाघाला आता जेरबंद करण्याएवजी ठार मारावे अशी मागणी लाखांदूर तालुक्यातील जंगल भागातील नागरिक करीत आहेत.

तर वनविभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकू- सीटी-१ वाघाचा लाखांदूर तालुक्यात धुमाकूळ सुरू आहे. आठ दिवसात दोघांचा बळी घेतला. या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात आला नाही तर वनविभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा लाखांदूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. सीटी-१ वाघाने वर्षभरात तब्बल १३ जणांचा बळी घेतला. लाखांदूर तालुक्यातील पुयार, कन्हाळगाव, चिचगाव मेंढा, इंदोरा, सोनी, दहेगाव, पिंपळगाव, मडेघाट या गावात वाघाची दहशत पसरली आहे. या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली. यावेळी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत, नगरपंचायतीचे गटनेते बबलू नागमोती, माजी नगरसेवक राकेश दिवटे, सुभाष खिलवानी, जितू सुखदेवे, अनिकेत शहारे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

वनविभागाने दिली १० लाखांची मदतसीटी-१ वाघाच्या हल्ल्यात शुक्रवारी ठार झालेला शेतकरी तेजराम कार या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना लाखांदूर वनविभागाने पुढाकार घेत शासनाकडून १० लाख रुपयांची तत्काळ मदत दिली. उपवनसंरक्षक राहुल गवई, सहायक वनसंरक्षक राठोड, लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित यांनी पुढाकार घेत तेजरामच्या कुटुंबीयांना ९ लाख ८० हजार रुपयांचा धनादेश व २० हजार रुपयांची रोख रक्कम अशी १० लाख रुपयांची मदत दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख उपस्थित होते.

चारभट्टी जंगलात शीघ्र कृती दलाची चमू तैनात- तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालून १३ जणांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ वाघाला जेरबंद करण्यासाठी लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी जंगलात शीघ्र कृती दलाची चमू तैनात करण्यात आली आहे. त्यात सहा शार्प शूटर असून वाघ दिसताच त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन मारण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जंगलात ठिकठिकाणी २५ टॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. मचाणावरून शीघ्र कृती दलाचे पथक खडा पहारा देत असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे. उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक रोशन राठोड व लाखांदूरचे वन परिक्षेत्राधिकारी रूपेश गावित यांच्या नेतृत्वात पथक वाघाचा शोध घेत आहेत. 

 

टॅग्स :Tigerवाघ