शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीटी-1 वाघ जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 23:23 IST

नरभक्षी सीटी १ वाघाने मागील १० महिन्यांपूर्वी विदर्भातील भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रातील जंगलात आतंक माजविले होते. या वाघाने नियमित अंतराने ३ जिल्ह्यांतील विविध जंगल क्षेत्रातील एकूण १३ पेक्षा अधिक व्यक्तींची शिकार केली होती. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील ४, गडचिरोली जिल्ह्यातील ६ व चंद्रपूर जिल्ह्यातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.

दयाल भोवतेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालून १३ जणांचा बळी घेणाऱ्या सीटी १ वाघाला वन विभागाने अखेर जेरबंद केले आहे. तब्बल १० महिन्यांनंतर नरभक्षी सीटी वन वाघाला जेरबंद करताच लाखांदूर तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गत तीन आठवड्यांपासून वाघ हुलकावणी देत होता. तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रात वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले.नरभक्षी सीटी १ वाघाने मागील १० महिन्यांपूर्वी विदर्भातील भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रातील जंगलात आतंक माजविले होते. या वाघाने नियमित अंतराने ३ जिल्ह्यांतील विविध जंगल क्षेत्रातील एकूण १३ पेक्षा अधिक व्यक्तींची शिकार केली होती. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील ४, गडचिरोली जिल्ह्यातील ६ व चंद्रपूर जिल्ह्यातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.नरभक्षी वाघाने शिकार केल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागांसह नागरिकांमध्ये प्रचंड दहशत व रोष व्यक्त केला जात होता.  नरभक्षी वाघाला तीन दिवसांत जेरबंद करण्याचे निर्देश मागील २ दिवसांपूर्वी शासनाने निर्गमित केले होते. १३ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती एकलपूर जंगल शिवारात नरभक्षी वाघाला डार्ट अंतर्गत बेशुद्ध करून पिंजऱ्यात कैद करण्यात आले आहे. निर्देशानुसार वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाघाला जेरबंद करण्याचे आव्हान पूर्ण करीत यश प्राप्त केल्याने नागरिकांत आनंद व्यक्त केला जात आहे. 

१५ दिवसांपासून देत होता हुलकावणी- १५ दिवसांत दोन व्यक्तींची शिकार करणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने वनपरिक्षेत्रांतर्गत तब्बल ६० ट्रॅप कॅमेरे व ठिकठिकाणी मचाणी उभारून त्यावर शार्प शूटर तैनात केले होते.  १५ दिवसांपासून वनविभाग वाघाच्या मागावर होते.

लाखांदूर तालुक्यातील चार जणांची शिकार- लाखांदूर तालुक्यातील विविध जंगलात नरभक्षी वाघाने एकूण ४ व्यक्तींची शिकार केल्याच्या घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये २७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास दहेगाव जंगलात जलाऊ लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या स्थानिक लाखांदूर येथील प्रमोद चौधरी नामक ५४ वर्षीय इसमाची शिकार केली होती तर ४ एप्रिल रोजी इंदोरा येथील जंगलात जयपाल कुंभरे (४०) वर्षीय नामक इसमाची मोहफुल गोळा करताना शिकार केली होती.  २१ सप्टेंबर रोजी विनय खगेण मंडल (४५) रा अरुणनगर नामक इसमाची मासे पकडण्यासाठी गेला असता वाघाने शिकार केली. या घटनेला आठवडा लोटत नाही तोच कन्हाळगाव शेतशिवारात मालकी शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी अन्य एका साथीदारासह गेलेल्या तेजराम कार नामक शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढवून ठार केले. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग