शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशके खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:46 IST

वातावरण बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात करपा, खोडकिड, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरु झालेली आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून गत दोन वर्षांपासून किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येत नसल्यामुळे शेतकºयांना महागडी औषधी घेण्यासाठी कृषी केंद्रात धाव घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्देकृषी केंद्र संचालकांची चंगळ : अनुदानावर पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वातावरण बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात करपा, खोडकिड, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरु झालेली आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून गत दोन वर्षांपासून किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येत नसल्यामुळे शेतकºयांना महागडी औषधी घेण्यासाठी कृषी केंद्रात धाव घ्यावी लागत आहे.भंडारा जिल्ह्यात गत २१ व २२ आॅगस्ट रोजी दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात रोवणी करून घेतली. सिंचनाच्या सुविधा असलेल्या शेतकºयांसाठी हा पाऊस वरदान ठरला. मात्र त्यानंतर धानपिकावर किडींचा प्रादूर्भाव झाला. परिणामी शेती पिवळी पडू लागली आहे. यावर आळा बसावा यासाठी शेतकºयांनी शक्कल लढवून अंधश्रद्धेचे प्रकार सुरु केले आहेत. सधन शेतकºयांनी कृषी केंद्रात जावून महागडी औषधी खरेदी केली. शेतपिकावर त्या औषधांची फवारणी देखील केली. मात्र फवारणीनंतरही कीड नियंत्रणात येत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. शेतकरी सध्या संकटात सापडला असून त्यांना कृषी विभागाच्या अधिकाºयांनी मार्गदर्शनाची ही योग्य वेळ आहे. एकीकडे कृषी विभागाचे अधिकारी जिल्ह्यात किडींचा प्रादूर्भाव नसल्याचे सांगत आहेत. कृषी विभागाचा हा प्रकार उंटावरून शेळ्या हाकण्याचा दिसून येते. शेतकºयांनी कर्ज काढून शेती कसत आहे. तर दुसरीकडे कृषी विभागाचे अधिकारी कीड नसल्याचे सांगून एक प्रकारे त्यांची थट्टा करून असल्याचे दिसून येते.कीड नियंत्रणासाठी शेतशिवारामध्ये फवारणीचे चित्र सर्वदूर दिसत आहे. यासंबंधी सदर प्रतिनिधींनी कृषी केंद्र येथे भेट दिली असता किडनाशके घेण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात येत आहेत. औषधी घेऊन आमच्याकडून मार्गदर्शन देखील घेतात. अनेक कृषीकेंद्राच्या फलकावर किटकनाशकांची नावे, कंपनीचे नाव, पॅकींग, दर व साठा लिहिल्याचे दिसून आले. किटकनाशकांची नावे लक्षात घेता ही नावे शेतकºयांसाठी विचित्र असल्याचे सांगण्यात आले. किटकनाशकामध्ये फ्रोफेक्स, कॅनान, इनरेज, फन्टर, ग्लोफस, सेकंड, अष्टोबिया, पिलाँग आदी नावे दिसून आली.