शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

पवनीत बँकेत गर्दी; बाजारात शुकशुकाट

By admin | Updated: November 13, 2016 00:24 IST

केंद्र शासनाने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यामुळे व्यवहारात त्या नोटा घेण्यास व्यापाऱ्याचा नकार आहे.

चर्चा नोटा बंदच्या : नागरिक त्रस्त, नोटांच्या व्यवहारावर परिणामपवनी : केंद्र शासनाने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यामुळे व्यवहारात त्या नोटा घेण्यास व्यापाऱ्याचा नकार आहे. बँकेत पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना नोटा बदलून घेण्यास तसेच बँकेतून रक्कम काढण्यास अडचणी येत आहेत. पवनीचा आठवडी बाजार (शनिवार) असुन देखील बँकेत गर्दी तयार बाजारा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातून शेतकरी शेतमजूर व मजूर वर्गीय नागरिक मोठ्या संख्येने बाजार करण्यासाठी आले परंतू बाजारात जाण्यापूर्वी चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी तसेच चलनात असलेल्या नोटा बँकेतून काढण्यासाठी बँकेतील रांगेत अडकून राहीले. बाजारातील व्यवहार रोखीने करावा लागत असल्याने रक्कम नाही तर बाजार नाही अशी अवस्था नागरिकांची झालेली होती. तासन्तास रांगेत राहून लोक थकले पंरतू नोटा बदलण्यासाठी व विड्राल करण्यासाठी थांबलेले लोक बँकेच्या लिंक फेल प्रकारामुळे कंटाळले व आल्या पावली बाजार न करता परतले. देशात सामान्य नागरिकांची थट्टा सुरु असल्याचे त्रस्त झालेले नागरिक आपसात बोलत होते.सहकारी पत संस्थेमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना देखील रक्कम उपलब्ध होवू शकली नाही. कारण त्यांच्याकडील दैनंदिन व्यवहाराची रक्कम सहकारी बँक किंवा राष्ट्रीय बँकेच्या शाखेत गुंतवलेली असते. त्यांना देखी मोठी रक्कम उपलब्ध होवू शकली नाही. नोटा चलनातून बाद झाल्यामुळे नगरातील मोठै तसेच लहान व्यापारी व किरकोळ विक्रेते यांना ५०० किंवा १००० ची नोट दाखवून व्यवहार न करता ग्राहक परतू लागला आहे. त्यामुळे त्यांचेही नुकसान झालेले आहे. (तालुका प्रतिनिधी)