शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

चांदपूर हनुमान देवस्थानात भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:05 IST

चांदपुर येथील जागृत हनुमान देवस्थानात नववर्षाचे पर्वाला आराध्य देवतांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

ठळक मुद्देआराध्य देवतांचे दर्शन : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात

रंजित चिंचखेडे।आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : चांदपुर येथील जागृत हनुमान देवस्थानात नववर्षाचे पर्वाला आराध्य देवतांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळपासून हजारो भाविक मोठ्या संख्येने येथे पोहचले. मकरसंक्राती पर्वापर्यंत भाविकांची गर्दी वाढणारी असल्याने गैरसोय टाळण्यासाठी उपाय योजना करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अजय खंगार यांनी दिली.चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थानात दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रेलचेल असते. परंतु विशेष पर्वावर ही वाढती गर्दी राहत आहे. नववर्षाचे पर्वावर राज्य आणि नजिकचे मध्यप्रदेशातुन हजारो भक्त भाविकांनी आराध्य दैवताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी हजेरी लावली आहे.सकाळपासून या देवस्थानात भाविकांचे लोंढे दाखल झाले आहे. मकरसंक्रातीची पर्वापर्यंत भाविकांची वाढती गर्दी राहणार असल्याने देवस्थान ट्रस्टचे वतीने नियोजन बध्द कृती आरखड्याची अमलबजावणी करण्यात सुरुवात केली आहे. देवस्थानात पिण्याचे पाणी आदीची सोय करण्यात आली असून रात्री मुक्कामी राहणाºया भाविकांचे गैरसोय टाळण्यासाठी उपाय योजना करण्यात आलेल्या आहे.लांब पल्ल्याचे ठिकाणाहून भाविक दाखल झाले आहेत. सातपुडा पर्वत रांगाचे घनदाट जंगलात देवस्थान असल्याने भाविकांना सुरक्षतता देण्यात आली आहे. नविन वर्षाचे पर्वाला पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी जागृत हनुमान देवस्थानात भाविकांनी दर्शन घेतले आहे. या देवस्थानात महिला व पुरुषाकरिता स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.वाढती गर्दीत गैरसोय होणार नाही. ट्रस्टचेवतीने नियंत्रण ठेवण्यात आले आहे. या देवस्थानात पार्किंगची प्रमुख समस्या आहे. जागेअभावी ही समस्या भेडसावत असल्याची माहिती आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी ट्रस्टने जुने दुकाने परिसरात मार्ग मोकळा केला आहे.यामुळे वाहत धारकांची गैरसोय टाळण्यासाठी रामबाण उपाय ठरला आहे, वयोवृध्द व अपंगत्व भाविकांना दर्शनासाठीे ये-जा करणारा माग्र मोकडा करण्यात आला आहे. यामुळे भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसी हजारो भाविकांनी आराध्य देवांची पूजाआर्चा करून वर्षभर सुरूळीत रहावे, यासाठी आशिर्वाद घेतले. देवस्थान कमेटीने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या.पर्यटनस्थळी पर्यटकांची हजेरीग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ बंद असताना पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. चारचाकी वाहनाने भाविक दाखल झाले असून निसर्ग वैभव बघून आनंदीत झाले आहे. निसर्गाचा ठेवा या पर्यटन स्थळात असतांना विकासाची जोड देण्यात लोकप्रतिनिधी गेल्या पाच वर्षापासून अपयशी ठरल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जंगल परिसरात पर्यटकांचे पारिवारीक सदस्यांनी स्वयंपाक आदी केले. जलाशयात पाणी असल्याने पर्यटकांनी जलाशयपासून दुरावा ठेवला आहे. जलाशय शेजारी वन विभागाचे वतीने सुचनाचे फलक लावून जागृत केले आहे. या पर्यटन स्थळात मध्यप्रदेशातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. पर्यटन स्थळात विश्रामगृह व शहण्याचे सुविधा नसल्याने दिवस भर पर्यटन स्थळात हजेरी नंतर गावाची वाट धरली आहे. शकडो पर्यटकांची हजेरी असतांना शासनाला महसूल प्रापत झाले नाही.मार्गावरुन वाहन धारकांची कसरतचुल्हाड ते चांदपूर हा पाच किमी अंतरचा प्रमुख मार्ग देवस्थान आणि पर्यटन स्थळाला जोडणारा आहे. या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. या शिवाय मार्ग अरुंद असल्याने भाविकांना मोठी कसरत करावी लागली आहे. रस्ता दुरुस्ती करिता सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याची खंत देवस्थान ट्रस्टचे सचिव तुलाराम बागडे यांनी व्यक्त केली आहे.