शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

कोट्यवधींच्या सदनिका भंगारावस्थेत

By admin | Updated: April 24, 2017 00:52 IST

चार दशकांपूर्वी पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयांतर्गत बांधण्यात आलेल्या कोट्यवधी रूपयांच्या सदनिका सद्यस्थितीत भंगारावस्थेत आहेत.

जागेचा उपयोग काय? : असामाजिक तत्वांचा वावर, व्यथा पशुसंवर्धन विभागाचीइंद्रपाल कटकवार भंडाराचार दशकांपूर्वी पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयांतर्गत बांधण्यात आलेल्या कोट्यवधी रूपयांच्या सदनिका सद्यस्थितीत भंगारावस्थेत आहेत. येथील जिल्हा परिषद चौक ते गणगेशपूरकडे जाणाऱ्या मार्गावरील उजव्या बाजुला या पडक्या व जुनाट सदनिकांमध्ये असामाजिक तत्वांचा वावर वाढला आहे. शासनाच्या विविधांगी उपक्रमांतर्गत पशुसंवर्धन विभागानेही जनावरांचे आरोग्य तथा संरक्षणासाठी विविध योजनांतर्गत पाऊले उचलली आहेत. सन १९७७ मध्ये पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयातर्फे (राज्यस्तर) गणेशपूरकडे जाणाऱ्या मार्गाच्या उजव्या बाजुला जवळपास अर्धा एकर जागेत कार्यालय, जिल्हा कूत्रिम रेतन केंद्र, सदनिका, पशु तपासणीगृह, गोडावून आदींचे बांधकाम करण्यात आले. सन १९९०च्या जवळपास या कार्यालयात कामकाज नियमितपणे सुरू होते. काही सदनिकांमध्ये कर्मचाऱ्यांचे वास्तव्यही होते. महामार्गापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर पशुसंवर्धन कार्यालय असल्याने शेतकरी तथा पुशपालकांनाही सोयीचे होत होते. याच कार्यालयजवज़ कृत्रिम रेतन केंद्रही अस्तित्वात होते. यासंबंधी साहित्यांचा पुरवठाही केला जात असे. कालांतराने या पशुसंवर्धन विभागातील काही पदे गोठविण्यात आली. याचवेळी जिल्हा सामान्य रूग्णालयाजवळ पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय स्थानांतरीत करण्यात आले होते. हळुहळु जुन्या कार्यालयातील साहित्य नविन उपायुक्त कार्यालयात हलविण्यात आले. अधिकारी, कर्मचारी तथा पशुपालकांचे येथे येणे-जाणे बंद झाल्याने कालांतराने जुनी इमारतीचेही हाल बेहाल झाले. सुविधांअभावी कर्मचाऱ्यांनीही सदनिका सोडली. आजघडीला जुन्या कार्यालय परिसरात कोट्यवधी रूपये खर्चुन बांधण्यात आलेल्या सदनिकांना भंगाराचे स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपी वाढली आहेत. शाचौलय, पाण्याच्या टाक्या, गटारे यामध्ये कचरा तुंबलेल्या आहेत. काही सदनिकांच्या बाहेरील भितींना तळे गेले आहेत. कार्यालयाची अवस्था दयनीय आहे. ‘हायवे टच’ असलेल्या या जागेत सायंकाळनंतर असमाजिक तत्वांचा वावर दिसून येतो. दारूच्या बाटल्या येथे दिसून येतात. दुकानातील तथा घरगुती कचराही येथे फेकला जात असल्याने आरोग्याची समस्या डोके वर काढत आहे. दुर्गंधीची समस्या कायम आहे. आजघडीला या जागेचा वापर मुतारीगृह म्हणून केला जात आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारीतील या जागेचा सदउपयोग होणार काय? हाच खरा सवाल उपस्थित होत आहे. साहित्य धूळ खातसन १९७० च्या दशकात बांधकाम झालेल्या या कार्यालय परिसरात कृत्रिम रेतन केंद्राचे साहित्यही ठेवण्यात येत होते. कार्यालय स्थानांतरीत झाल्यावर उपयोगात असलेले साहित्य नेण्यात आले, परंतू आजही येथील कार्यालयात काही टबल, खुर्च्या, जुने दस्यावेजांचे गठ्ठे, कृत्रिम रेतनसाठी आणलेल्या काचेचे बॉटल्स, कार्यालयीन स्टेशनरी धूळ खात आहे. इमारतींचे दरवाजे व खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. कार्यालयआवारात दारूच्या बॉटल्या तर आतमध्ये मादक पदार्थांचे सेवन करित असल्याच्या खुणा आढळल्या. ‘लॅव्हेटरी’ची अवस्था बिकट आहे. कार्यालय इमारत, सदनिका सभोवताल तारेचे कुंपण घालण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १९ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय कार्यालय दुरूस्ती व पाण्याच्या व्यवस्थेसाठी (बोअरवेल) अनुक्रमे १० व पाच लक्ष रूपयांची निधी मंजूर झाला आहे. ही सर्व कामे येत्या काही दिवसात बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहेत.- डॉ.ए.व्ही. वरारकरपशुधन विकास अधिकारीजिल्हा कृत्रिम रेतन केंद्र भंडारा.