शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामाचे कोट्यवधी रूपये अडले

By admin | Updated: February 17, 2017 00:38 IST

इंदिरा आवास योजने अंतर्गत बांधकाम करण्यात येणाऱ्या घरकुलासह शौचालय बांधकामाची अट घालून

लाभार्थ्यांची होतेय परवड : घरकूल योजनाराहुल भुतांगे   तुमसरइंदिरा आवास योजने अंतर्गत बांधकाम करण्यात येणाऱ्या घरकुलासह शौचालय बांधकामाची अट घालून लाभार्थ्यास १२ हजार रूपयांचा निधी निर्मल भारत अभियाना अंतर्गत लाभार्थ्यांना देण्याचे शासन निर्णयात नमूद आहे. परंतु त्या निर्णयाला बगल देत वेगळेच फंडा बाहेर काढल्याने तालुक्यातील १,२७७ लाभार्थ्यांच्या शौचालयाचे १ कोटी ५३ लाख २४ हजार रूपये अडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.सन २०१५-१६ मध्ये तुमसर पंचायत समिती अंतर्गत १५१७ घरकूल मंजुर करण्यात आले होते. पैकी २४ लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रा अभावी अपात्र ठरविण्यात आले. सदर घरकुल योजनेत लाभार्थ्यास १ लक्ष २८ हजार रूपये, निधी मिळणार होती यात बांधकामाकरिता १ लक्ष रूपये निर्मल भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधकामाकरिता १२ हजार रूपये, तर मनरेगा अंतर्गत अकुशल कामाकरिता १६ हजार रूपये असे एकूण १ लाख २८ हजार रूपयाची ही योजना आहे. तालुक्यात पात्र १२७५ घरकुलापैकी ७०३ घरकुल हे पुर्ण झाले आहेत तर उर्वरित प्रगतीपथावर असून लवकरच पुर्णत्वास येत आहेत. शासन परिपत्रक २०१४ च्या नुसार लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी निधी हा जास्तीत जास्त तीन हप्त्यातच देण्यात यावा. घरकुलाचे लाभार्थ्यांकडून करारनामा करून घेतल्यावर पहिला हप्ता ३७ हजार रूपयाचे देण्यात यावे व त्यासोबत निर्मल भारत अभियानामधून शौचालयासाठी मिळणारे १२ हजार रूपयाचे अनुदान देण्यात यावे व तिसऱ्या हप्त्यापुर्वी शौचालयासह घरकुलाचे बांधकाम पूर्ण केल्यावर द्यावे असे निर्देश आहेत. मात्र तुमसर तालुक्यात बांधकामाचे १ लक्ष व मनरेगाचे १६ हजार रूपये देण्यात आले मात्र निर्मल भारत अभियानाकडून शौचालयाचा एक रूपयाही देण्यात आला नसल्याने लाभार्थी आर्थिक संकटात सापडला असताना प्रोजेक्ट डायरेक्टर यांनी शासन निर्णयाला बगल देवून स्वच्छ भारत अभियानांतर्गत बेस लाईन सर्व्हे ज्यांची नावे असतील अशांनाच शौचालयाच्या निधीचा लाभ मिळणार असल्याचा नवा फंडा बाहेर काढून घरकुल लाभार्थ्यांचे दिड कोटी रूपयाचा निधी अडवून ठेवला आहे.