शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याने पीक वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:25 IST

मांढळ (दे) शिवारात बावनथडी प्रकल्पाअंतर्गत रेल्वे लघु उपकालवा क्रमांक ५ फुटल्याने सुमारे ५० एकरातील धान पीक वाहून गेले.

ठळक मुद्देबावनथडीचा उपकालवा फुटला : मांढळ ते शिवारातील मालवा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मांढळ (दे) शिवारात बावनथडी प्रकल्पाअंतर्गत रेल्वे लघु उपकालवा क्रमांक ५ फुटल्याने सुमारे ५० एकरातील धान पीक वाहून गेले. यासंदर्भात स्थानिक शेतकºयांनी प्रकल्प अधिकाºयांशी संपर्क केल्यावर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सिंचनाची हमी घेण्याची जबाबदारी घेणारे व पाठ थोपटवून घेणाºया अधिकाºयांवर कारवाईची मागणी शेतकºयांनी केली आहे. प्रकल्पाची कामे येथे निकृष्ठ दर्जाची झाली आहेत. त्याचा हा पुरावाच म्हणावा लागेल.शनिवारी दुपारी ३ ते ४ दरम्यान मांढळ दे येथे रेल्वे लघु उपकालवा क्रमांक ५ फूटला. सध्या बावनथडी प्रकल्पाचे पाणी धान पिकाकरिता देणे सुरू आहे. पाण्याचा दाब वाढल्याने कालवा फूटला. कालवा फूटल्याने परिसरातील सुमारे ५० एकरातील धान पीक नष्ट झाले. कालव्याचे पाणी बंद करण्याकरिता येथील शेतकरी राजू सेलोकर यांनी बावनथडी प्रकल्प अधिकाºयांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या धानपिक नुकसानीचे नुकसान भरपाई बावनथडी प्रकल्प अधिकाºयांनी द्यावी, अशी मागणी सेलोकर यांनी केली.बावनथडी प्रकल्पाच्या लघु उपकालव्यांची कामे चार ते पाच वर्षापुर्वी परिसरात झाली आहेत. कामांचा दर्जा निकृष्ठ असून कालव्यातून पाणी समांतर वाहत नाही. कुठे उंच तर कुठे सखल असा हा कालवा आहे. वितरकेची कामे तर अतिशय निकृष्ठ आहेत. दोन ते तीन वर्षातच उपकालवा फूटतो यावरून येथील कामांचा दर्जा दिसून येतो. कालव्यात व वितरिकेत मोठे गवत वाढले आहे. त्याची स्वच्छता शेतकरीच करतो. दोन वर्षापुर्वी येथे कालवा फूटला होता. तेव्हा मुंबई-हावडा ट्रॅकजवळ नाल्यात अनेक दिवस पाणी साचले होते. धानपिकाला आता सिंचन कसे होईल, असा प्रश्न येथे पडला आहे. कालवा व उपकालव्याच्या कामांची चौकशी करण्याची मागणी राजू सेलोकर यांनी केली आहे.