शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

मगरीने तयार केले स्वत:साठी घर!

By admin | Updated: January 14, 2017 00:25 IST

तालुक्यातील सावरला येथील शेतकऱ्यांचे मालकी हक्क असलेल्या गावालगतच्या तलावात मगरीचे वास्तव्य असल्याने तलावाकडे नागरिक ये-जा करु लागले आहेत.

अशोक पारधी पवनीतालुक्यातील सावरला येथील शेतकऱ्यांचे मालकी हक्क असलेल्या गावालगतच्या तलावात मगरीचे वास्तव्य असल्याने तलावाकडे नागरिक ये-जा करु लागले आहेत. दरम्यान मगरीने स्वरंक्षणासाठी तलावाच्या पाळीमध्ये मोठे छिद्र करुन स्वत:साठी घर तयार केले आहे.सावरला तलावात मगरी असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर परिसरातील नागरिकांचे लोंढे मगरीला पाहण्यासाठी तलावाकडे जावू लागले आहेत. कपडे धुवायला तलावाकडे जाणाऱ्या महिला व मासेमारीसाठी तलावात जाणारे ढिवर बांधव भयग्रस्त आहेत. मासेमारी करण्यासाठी जाणे भितीदायक असल्याने मच्छीमारांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मगरीला शक्य तितक्या लवकर तलावातून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी जिल्हा मत्स्य उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे यांनी वनविभागाकडे केलेली आहे.भर पावसाळ्यात म्हणजे आॅगस्ट २०१६ पासून मगरीचे ह्या तलावात वास्तव्य असल्याचे मासेमारी करणाऱ्यांना समजले होते. परंतु ती आली तशीच आपोआप बाहेर जाईल असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी यापूर्वी वाच्यता केलेली नाही. अखेर लोकमतने बातमी प्रसिध्द केल्यानंतर सर्वांचे लक्ष मगरीच्या स्थलांतराकडे लागलेले आहे. मगरीला बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करावी लागेल त्याचा आढावा घेण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी डी. एन. बारई, सामाजिक वनीकरणाच्या लागवड अधिकारी भाग्यश्री पोले, सावरला क्षेत्राचे वनपाल अजीज खान यांनी सावरला तलावाजवळ जावून प्रत्यक्ष पाहणी केली. मासेमारी करणाऱ्या ढिवर समाजबांधवांसोबत चर्चा केली. मुख्य वनसंरक्षक नागपूर विभाग यांची परवानगी घेवून मगरीच्या स्थलांतरणासाठी रेस्क्यु आॅपरेशन राबविण्यात येईल, अशी माहिती यावेळी वनक्षेत्रअधिकारी यांनी दिली.