शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्त्यांचे निकृष्ट बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:08 IST

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाद्वारे महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. याद्वारे सिंचन विहिर, भात खाचरे, नाला सरळीकरण, नाली बांधकाम, सिमेंट रस्ते, पांदन रस्ते असे विविध विकास कामे केली जात आहेत.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : ग्रामपंचायत प्रशासन व कंत्राटदारांचे संगनमत

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाद्वारे महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. याद्वारे सिंचन विहिर, भात खाचरे, नाला सरळीकरण, नाली बांधकाम, सिमेंट रस्ते, पांदन रस्ते असे विविध विकास कामे केली जात आहेत. या माध्यमातून मजुरांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला जातो आहे. मात्र यात सिमेंट रस्त्यांचे निकृष्ट बांधकाम होत असून प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन व कंत्राटदारांनी आपली खिसे भरण्याचे काम सुरू केले आहे.असाच काही प्रकार तालुक्यातील मोहरणा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना सन २०१७-१८ अंतर्गत दोन सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले असून, दोन्ही रस्ते निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहेत. काम केल्याच्या दहा दिवसातच रस्त्याला भेगा पडल्या आहेत.प्रशासकीय मान्यता ६० दि.२२/०१/२०१८ अंतर्गत ९ लक्ष ९७ हजार ४६० रूपयाची २५० मीटर लांबीची दोन सिमेंन्ट रस्ते करण्यात आली असून, त्यात उद्धव उरकुडे, मोरेश्वर राऊत ते कुशन मेश्राम यांच्या घरापर्यंत १२५ मीटर लांबी तर श्रीराम भागडकर ते रामदास राऊत यांच्या घरापर्यंत १२५ मीटर लांबीची अंदाजपत्रकीय रक्कमेनुसार ४ लक्ष ९८ हजार ७३० रूपयाची कामे करण्यात आली आहेत.मात्र सदर दोन्ही रस्त्याचे काम करताच रस्त्याला भेगा पडल्या असल्याचे ग्रामस्थांकडून नाराजीचा सूर निघत आहे. काम करणारी यंत्रणा खुद्द ग्रामपंचायत असून, या कामाच्या माध्यमातून ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची खिसे भरण्याच्या लालसेपोटी ग्रामस्थांचे नुकसान केले आहे.माहितीनुसार काम करणारी यंत्रणा ग्रामपंचायत मोहरणा असली तर सदर काम गावप्रमुखाने आपल्या मजीर्तील लोकांना करण्यासाठी दिले असल्याचे बोलले जात आहे. करण्यात आलेले काम निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने ग्रामस्थांनी ही बाब वॉर्ड सदस्यांसमोर कथन केली. त्यानुसार वॉर्ड सदस्यांनी झालेल्या गैरप्रकाराविरोधात आवाज उठवित दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.