शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण, संस्कारामुळे तंटामुक्त समाजाची निर्मिती

By admin | Updated: August 10, 2014 22:50 IST

कायदा फक्त सत्य स्थिती काय आहे ते सांगतो. पण त्यासाठी चांगले शिक्षण व आपले संस्कार अंगी असणे अत्यंत आवश्यक आहे. उदार शिक्षण व आपल्यांमधील संस्कारामुळेच तंटामुक्त समाजाची निर्मिती होऊ शकते.

भंडारा : कायदा फक्त सत्य स्थिती काय आहे ते सांगतो. पण त्यासाठी चांगले शिक्षण व आपले संस्कार अंगी असणे अत्यंत आवश्यक आहे. उदार शिक्षण व आपल्यांमधील संस्कारामुळेच तंटामुक्त समाजाची निर्मिती होऊ शकते. असे न्यायमूर्ती व्ही.जी. धांडे यांनी व्यक्त केले. जे.एम. पटेल महाविद्यालयात कायदा जनजागृती अंतर्गत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून न्या. धांडे बोलत होते. हा कार्यक्रम भंडारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महविद्यालयाच्या विज्ञान व्यवस्थापन विभागामार्फत आयोजित करण्यात आला होता. यात रॅगींग विरोधी कायदा, शिक्षणाचा अधिकार कायदा व सायबर कायदा याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून न्या. व्ही.जी. धांडे उपस्थित होते. अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे, न्यायाधिश आर.डी. पतंगे (इंगळे), न्या.आर.डी. डफरे, न्या.एम.एल. अलोणे, प्रा.डॉ. कार्तिक पणीकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य ढोमणे म्हणाले, आपण सध्या सोशल मिडीयाच्या जगात वावरत आहोत. माहितीचे आदान प्रदान सोशल मिडीयामुळे शक्य झाले आहे. म्हणून माहितीचे आदान-प्रदान करताना मोठी दक्षता घेणे गरजेचे झाले आहे. क्षणामध्ये शेकडो लोकांना माहिती प्रदान करत असतो. म्हणून मिळालेल्या सेवेचा दुरुपयोग होता कामा नये.न्या. पतंगे म्हणाल्या, रॅगींग विरोधी कायद्यामुळे समाजात जनजागृती होत आहे. महाराष्ट्र प्रतिबंधक रॅगींग विरोधी कायद्यात विविध बहुपयोगी टप्पे घालण्यात आले असून त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा बाहेर जगात त्याचा वापर सहजतेने करता येऊ शकतो. न्या. डफरे म्हणाल्या, सायबर लॉ मध्ये महत्त्वपूर्ण बाबींचा प्रावधान करण्यात आला आहे. त्यांनी हॅकिंग व क्रॅकिंग या दोन शब्दांचा विस्तृतपणे अर्थ समजावून सांगितला. मोबाईल फोन, इंटरनेट या साधनांचा वापर मानसिक त्रास किंवा छळण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. न्या. अलोणे म्हणाल्या, शिक्षणाचा अधिकार हा सर्वांना आहे. राईट टू एज्युकेशन हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून नि:शुल्क शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. प्रा.पणीकर यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)