शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

सावली निर्माण करण्यासाठी उन्हातच उभे राहावे लागते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:27 IST

आपल्याला आपली सावली निर्माण करायची असेल तर उन्हात उभे राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने कलाकार गिरीश पांडे, मुंबई यांनी केले.

ठळक मुद्देगिरीश पांडे : लाखनी येथे ग्रेट भेट कवी कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपल्याला आपली सावली निर्माण करायची असेल तर उन्हात उभे राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने कलाकार गिरीश पांडे, मुंबई यांनी केले.राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय आणि समर्थ विद्यालय, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शंकरराव भदाडे यांच्या स्मृति प्रीत्यर्थ ग्रेट भेट कवी आणि कलावंतांशी कार्यक्रम समर्थ विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवी लोकनाथ यशवंत लाभले होते. कवी लोकनाथ यशवंत यांच्या कविता वर्ग १० ते एम. ए. पर्यतच्या अभ्यासक्रमाला असून प्रत्यक्ष कवींनी कविता सादरीकरण केले.कवी लोकनाथ यशवंत यांनी विद्यार्थ्यांना आपले ज्ञान हे व्यापक करा, लहान लहान गोष्टी मधून मार्ग काढायला शिकले पाहिजे. आपले अनुभव सांगताना ते म्हणाले, मी दहाव्या वर्गात तीनदा नापास झालो मात्र आज एम. ए. ला कविता आहे, हे केवळ माझ्यातील कविमनामुळे सिद्ध झाले. माझी कविता ही गरीब, दु:ख, दिन हे जिथे असेल, त्यांच्या उत्थानासाठी लिहिलेली आहे.सुप्रसिद्ध सिने अभिनेता गिरीश पांडे यांनी सांगितले की, वाचन, मनन आणि लेखन हे या विश्वाचे गमक आहे. मराठी बोलणे लिहिणे यातून आपले व्यक्तिमत्व कळते. मी अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करत असतांना त्यांच्या भाषिक समृद्धतेचा संस्कार अनुभवता आला. आपल्याला आपली सावली निर्माण करायची असेल तर उन्हात उभे राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.कार्यक्रमाला मुख्याध्यापक दा. ई. प्रधान, डॉ संजय निंबेकर, डॉ सुरेश खोब्रागडे, किशोर आळे, राजेंद्र भदाडे, विकास खेडीकर, प्रशांत ढोमने, श्रीकृष्ण पटले, शिवलाल निखाडे, अ‍ॅड कोमलदादा गभणे, अतुल भांडारकर, विजया घनमारे, सी. एम. बागडे, कारवट, देशपांडे, ग्रंथपाल पवन पडोळे यांच्यासह तालुक्यातील कवी उपस्थित होते. प्रास्ताविक अजिंक्य भांडारकर, संचालन अक्षय मासुरकर तर आभार गोवर्धन शेंडे यांनी मानले.