करडी (पालोरा) : विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेच्या माध्यमातून स्रेहसमेलनात सहभाग घ्यावा. विद्यार्थ्यांनी गणित विषयावर प्रेम करून त्यातील कोडे सोडविण्यासाठी प्रयत्न केल्यास जीवनात यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे विभागीय अध्यक्ष उल्हास फडके यांनी केले. करडी जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या वतीने आयोजित तीन दिवसीय स्रेहसंमेनाचे उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप ताले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण परिषदेचे जिल्हा कार्यवाह मंगेश बेहलपांडे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे, पंचायत समिती सदस्य विलास गोबाडे, सरपंच संजय भोयर, स्टेट बँक मुंढरी शाखेचे व्यवस्थापक जितेंद्र मुरकुटे, भाऊराव लाळे, पुष्पलता ढेेंगे, कल्पना गोबाडे, प्राचार्य दयाळनाथ माळवे, निर्मला चकोले, मीरा टेकाम, द.ह. तुमसरे, अनंतराम तुमसरे, धनवर बडगे, बाळकृष्ण शेंडे, प्रकाश तुमसरे, भोजराम तिजारे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी सभापती ताले यांनी, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे नियमित लक्ष ठेवावे, यश हमखास पदरी पडेल. अपयशाला घाबरू नका, पुन्हा जोमाने कामाला लागा. कार्यक्रमाचे संचालन के.पी. बंसोड यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य दयाळनाथ माळवे, अहवाल वाचन विष्णू मेश्राम तर आभार शिक्षक शांताराम अगळे यांनी मानले. सुनिता ढेंगे, एस.के. शामकुंवर, जे.एम. अजवर, बी.एस. टेंभरे, कविराज कुर्वे, एस.डी. झाडे, ए.एस. बोरकर, मेघा कामथे, अपेक्षा रोडगे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा समिती पदाधिकारी, पालक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
गणिताविषयी आवड निर्माण करा
By admin | Updated: January 3, 2015 22:57 IST